पाटण्यातील प्रसिद्ध उद्योगपती गोपाळ खेमका यांची हत्या

Businessman Gopal Khemka

पाटणा – बिहारच्या पाटणातील (Patna ) प्रसिद्ध उद्योगपती गोपाळ खेमका (Businessman Gopal Khemka) यांची काल गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ते पाटण्यातील मोठे व्यापारी म्हणून प्रसिद्ध होते. ते मगध रूग्णालयाचे मालकही होते. २०१८ साली खेमका यांचे चिरंजीव गुंजन खेमका यांचीदेखील औद्योगिक पोलीस ठाण्याच्या परिसरात अशाच प्रकारे हत्या (Gunjan Khemka Murder )झाली होती.

काल रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास गोपाळ खेमका हे गांधी मैदान राम गुलाम चौक (Gandhi Maidan Ramgulam Chowk) येथील त्यांच्या राहत्या घराजवळ आपल्या कारमधून (Car)उतरत होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी ( bike-borne criminals ) त्यांना अडवले आणि त्यांच्या डोक्यात अगदी जवळून गोळी झाडली. गोळी लागताच खेमका जमिनीवर कोसळले आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेची माहिती मिळताच गांधी पोलीस ठाण्याच्या पोलिसांसह सर्व उच्च अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनस्थळाची पाहणी करून खेमका यांचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. यावेळी पोलिसांनी (police )घटनास्थळावरून एक गोळीदेखील जप्त केली. सध्या या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.