Nehal Modi | पंजाब नॅशनल बँक (PNB) घोटाळ्याप्रकरणी फरार हिरे व्यापारी नीरव मोदीचा (Nirav Modi) भाऊ निहाल मोदी याला अमेरिकेत अटक(Nehal Modi) करण्यात आले आहे. भारताच्या प्रत्यार्पण विनंतीनंतर 4 जुलै 2025 रोजी निहालला ताब्यात घेण्यात आले. हे भारतासाठी राजनैतिक यश मानले जात आहे.
निहालवर मनी लॉन्ड्रिंग (money laundering), गुन्हेगारी कट आणि पुरावे नष्ट करण्याचे आरोप आहेत. 13,500 कोटी रुपयांच्या PNB घोटाळ्यात नीरव मोदी, त्याचे काका मेहुल चोक्सी आणि निहाल यांनी बँकेला फसवल्याचा आरोप आहे.
निहाल मोदीवरील आरोप
केंद्रीय अन्वेषण ब्युरो आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या तपासात निहालने गुन्ह्याच्या रकमेची मनी लॉन्ड्रिंग करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे उघड झाले. त्याने शेल कंपन्या आणि जटिल परदेशी व्यवहारांद्वारे अवैध निधी लपवला आणि हस्तांतरित केला.
दुबईतील फायरस्टार डायमंडमधून 50 किलो सोने, हाँगकाँगमधून 6 दशलक्ष डॉलर किमतीचे हिरे आणि 150 बॉक्स मोती घेऊन त्याने गुन्ह्याच्या रकमेचा व्यवहार केला. तसेच, त्याने डिजिटल पुरावे नष्ट केले, साक्षीदारांना धमकावले आणि खोटी कागदपत्रे तयार केली. एका साक्षीदाराला युरोपमधील न्यायिक अधिकाऱ्यांसमोर खोटी साक्ष देण्यासाठी 20 लाख रुपये देऊ केल्याचा आरोपही आहे.
प्रत्यार्पणाची प्रक्रिया
नीरव मोदीला 2019 मध्ये फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यात आले असून, तो सध्या लंडनच्या तुरुंगात आहे. यूके उच्च न्यायालयाने त्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली असली, तरी अपिलांमुळे प्रक्रिया लांबली आहे. मेहुल चोक्सीला यावर्षी अँटवर्प, बेल्जियम येथे अटक झाली होती.
PNB घोटाळ्यात नीरव मोदी, मेहुल चोक्सी आणि निहाल यांनी फसव्या लेटर ऑफ अंडरटेकिंगद्वारे बँकेला 13,500 कोटींचा चुना लावला. निहालने दुबई आणि हाँगकाँगमधून अवैध व्यवहार करत गुन्ह्याची रक्कम लपवली. त्याने साक्षीदारांना कैरोला पाठवून त्यांचे पासपोर्ट काढून घेतले आणि खोटी कागदपत्रे तयार केली. तपासात या सर्व बाबी उघड झाल्या आहेत.
प्रत्यार्पण प्रकरणाची पुढील सुनावणी 17 जुलै रोजी होणार आहे. या सुनावणीदरम्यान निहाल जामिनासाठी अर्ज करण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या खटल्याने त्याच्या अर्जाला विरोध करणार असल्याचे म्हटले आहे.