सरकारी नोकरीत महिलांना ३५ टक्के आरक्षण नितीश कुमारांची घोषणा

35% reservation for women in government jobs – Nitish Kumar’s announcement

35% reservation for women in government jobs – Nitish Kumar’s announcement


पाटणा – बिहारमध्ये लवकरच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar women reservation)यांच्या सरकारने महिलांना सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांमध्ये ३५ टक्के (35 percent reservation for women)आरक्षण देण्याची घोषणा केली. नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय़ घेण्यात आला. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा नितीश कुमार यांचा मास्टर स्ट्रोक समजला जात आहे.(Nitish Kumar announcement 2025)
मूळ बिहारच्या रहिवासी असलेल्या महिलांना राज्य सरकारमधील सर्व स्तरांवरील, सर्व पदांवरील नोकऱ्यांमध्ये ३५ टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे. शासन आणि प्रशासनात महिलांचा जास्त जास्त सहभाग असावा, असा हा यामागील उद्देश आहे, असे नितीश कुमार यांनी सांगितले.(Women quota in govt jobs)
या बैठकीत महिला आणि तरुणांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले. युवकांच्या कल्याणासाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला असून आयोगाच्या माध्यमातून महिला आणि युवकांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे.