Raj Thackeray | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कार्यकर्ते आणि प्रवक्त्यांना माध्यमांशी किंवा सोशल मीडियावर कोणत्याही मुद्द्यावर परवानगीशिवाय बोलण्यास मनाई केली आहे.‘एक्स’वर पोस्ट करत राज ठाकरे यांनी स्पष्ट केले की, पक्षाच्या अधिकृत प्रवक्त्यांनीही त्यांच्या परवानगीशिवाय कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये.
मराठी-हिंदी वाद, मीरारोडमधील संघर्ष आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या युतीच्या चर्चांमुळे मनसे सध्या चर्चेत आहे. मनसेकडून मीरारोड येथे मोर्चा देखील काढण्यात आला होता.
राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आदेश देत ‘एक्स’वर लिहिले की, “पक्षातील कोणीही वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही. तसंच स्वतःचे प्रतिक्रियांचे व्हिडीओज सोशल मीडियावर टाकायचे हे पण अजिबात करायचं नाही.
एक स्पष्ट आदेश… पक्षातील कोणीही वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही. तसंच स्वतःचे प्रतिक्रियांचे व्हिडीओज सोशल मीडियावर टाकायचे हे पण अजिबात करायचं नाही.
— Raj Thackeray (@RajThackeray) July 8, 2025
आणि माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे…
‘माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे त्यांनी देखील मला विचारल्याशिवाय, माझी परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाहीये, आणि सोशल मीडियावर व्यक्त व्हायचं नाही.’, असे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहेत.
दरम्यान, 20 वर्षांनंतर राज आणि उद्धव ठाकरे ‘मराठीसाठी’ मेळाव्यात एकाच व्यासपीठावर आले, ज्यामुळे मनसे-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युतीच्या चर्चांना उधाण आले आहे. हिंदी सक्तीविरोधात एकत्र लढल्यानंतर हा मेळावा विजयी आयोजित करण्यात आला होता. आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्याआधी हे दोन्ही पक्ष एकत्र येणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.