पुण्यात विक्रेत्यांकडून अतिक्रमण विभागाच्या पथकावर हल्ला; कर्मचारी गंभीर जखमी

Encroachment department team attacked by vendors in Pune

पुणे – पुण्यातील(pune)रामटेकडी-सय्यदनगर फुटपाथवरील अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकावर भाजीपाला विक्रेत्यांनी अचानक हल्ला केला. दगड आणि लोखंडी मापांचा वापर करत हल्ला केला . या हल्ल्यात निखील इंगळे हे कर्मचारी गंभीर जखमी झाले. महापालिकेच्या वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेचे कर्मचारी किरण शिंदे, श्लोक तारु, रोहित अवचरे, दिनेश यादव, निखील इंगळे, मंगेश घाणेकर, आदित्य खुडे, यश कांबळे आणि चालक अब्दुल शेख यांचे पथक डीपी रोड, नवीन म्हाडा येथे कारवाईसाठी गेले होते. तेथे ५ ते ६ विक्रेते रस्त्यावर फळे व भाजी विक्री करत होते. पथकाने कारवाई सुरू केली असता विक्रेत्यांनी विरोध केला. अधिकारी किरण शिंदे यांनी समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. उलटपक्षी, विक्रेत्यांनी अचानक दगडफेक करत लोखंडी मापाने मारहाण सुरू केली. यामध्ये निखील इंगळे यांच्या डोक्यावर व कपाळावर गंभीर जखम झाली. महापालिकेच्या वाहनाचीही तोडफोड करण्यात आली. या हल्ल्यामुळे पथकाला माघारी परतावे लागले. या प्रकरणी सहायक अतिक्रमण निरीक्षक किरण शिंदे यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सोहेल शेख, शाहीद मौलाली शेख आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.