मध्यप्रदेशात स्कुटी दिल्या महाराष्ट्रातही देणार का?

Scooters were given in Madhya Pradesh ! will they be given in Maharashtra too?

Scooters were given in Madhya Pradesh ! will they be given in Maharashtra too?


भोपाळ – मध्य प्रदेश (MP goverment)सरकारने सरकारी शाळांमधील इयत्ता बारावीमध्ये गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिक स्कूटी मोफत देण्याची घोषणा काल जाहीर केली. त्याआधी मध्य प्रदेश सरकारने (ladli bahana)लाडली बहना ही योजना लागू केली होती. त्या योजनेची नक्कल करत महाराष्ट्रातील महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. आता मध्य प्रदेश सरकारने गुणवंत विद्यार्थ्यांना स्कूटी(Scooter Scheme) देण्याचा निर्णय घेतल्यामुळे महाराष्ट्रातही अशी योजना लागू होईल का,अशी चर्चा सुरू झाली आहे.(Government Benefits)
भोपाळमधील कमला नेहरू सांदिपनी कन्या विद्यालयात काल गुरु पौर्णिमेनिमित्त विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थिनींना संबोधित करताना मुख्यमंत्री मोहन यादव यांनी विद्यार्थ्यांसाठी अनेक योजनांची घोषणा केली. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील महिन्यात इलेक्ट्रिक स्कूटी मोफत देण्यात येईल असे त्यांनी सांगितले. राज्यातील सर्व सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत शिकवणी वर्ग सुरू करण्याची घोषणाही मुख्यमंत्री(CM) यादव यांनी केली.(Scooter Subsidy)
महू, देवास आणि नरसिंगपूर या जिल्ह्यांमधील ज्या शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे त्या शाळांना प्रत्येकी ५ लाख रुपये इनाम देण्याची घोषणाही यादव यांनी केली.