१ जुलैपर्यंत मतदार यादीत नोंदणी !पालिका निवडणुकांचे नियोजन

Voter registration until July 1! Planning for municipal elections

Voter registration until July 1! Planning for municipal elections

मुंबई- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका घेण्यासंदर्भात मतदार संख्या, मतदार केंद्र, उपलब्ध इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि उपलब्ध मनुष्यबळाचा विचार करून नियोजन(Election Planning)सुरू केले आहे. (Voter Registration)त्यासाठी १ जुलै २०२५ पर्यंत नावे नोंदविलेली विधानसभेची मतदार यादी वापरण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यादृष्टीने तयारी करावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत. त्यामुळे १ जुलैपर्यंत ज्यांनी मतदार यादीमध्ये नोंदणी केली आहे, त्यांनाच आगामी निवडणुकीत मतदान करता येणार आहे.(Municipal Elections)

राज्यातील (Election Schedule)जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या आगामी निवडणुकांच्या प्राथमिक तयारीसंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे काल जिल्हाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी राज्य निवडणूक आयोग आयुक्त दिनेश वाघमारे, सचिव सुरेश काकाणी यांच्यासह आयोगाचे विविध अधिकारी उपस्थित होते. आयुक्त वाघमारे म्हणाले की, (Election Commission)स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वतंत्र मतदार यादी तयार केली जात नाही. भारत निवडणूक आयोगाने तयार केलेली मतदार यादी वापरली जाते. १ जुलै २०२५ पर्यंत नावे नोंदविलेल्या यादीच्या उपलब्धतेबाबत भारत निवडणूक आयोगाशी प्राथमिक चर्चा झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बहुसदस्यी पद्धतीने घेण्यात येतात. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत मतदान केंद्रांची संख्या वाढणार आहे.त्यामुळे मतदान केंद्र निश्चितीबाबत राज्य निवडणूक आयोगाने स्वतंत्र आदेशाद्वारे निकष निश्चित केले आहेत.