अहिल्यानगर-मनमाड मार्गासाठी निलेश लंकेंचे बेमुदत उपोषण

Sharad Pawar group MP Nilesh Lanke

अहिल्यानगर – अहिल्यानगर जिल्ह्यासाठी महत्त्वाचा असलेला नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्ग (क्र. १६०) (The Nagar-Manmad National Highway) आजही दुरवस्थेतच आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला प्रशासनाकडून दिरंगाई (continuously delayed)होत आहे. त्यामुळे शरदचंद्र पवार गटाचे खासदार निलेश लंके (MP Nilesh Lanke) यांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण (hunger strike) सुरू केले आहे. यापूर्वी आमदार असताना लंके यांनी नगर-पाथर्डी व नगर-मनमाड रस्त्याच्या कामासाठी आंदोलन केले होते.

अहिल्यानगर -मनमाड राष्ट्रीय महामार्ग रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
या महामार्गावरील खड्डे, उखडलेले डांबर, अपूर्ण डांबरीकरण आणि निकृष्ट जलनिचरा व्यवस्था यामुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. अनेकांनी जीव गमावले असून, वाहनचालक व प्रवाशांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे. वेळोवेळी तक्रार करूनही प्रशासन दखल घेत नसल्याचा आरोप स्थानिक करत आहेत.

यावेळी निलेश लंके म्हणाले की, सावळीविहीर ते अहिल्यानगर बायपासदरम्यानच्या ७५ किमी चौपदरीकरणाचे कंत्राट भारत कन्स्ट्रक्शन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आले असून, काम मंजूर होऊनही प्रत्यक्ष सुरुवात झालेली नाही. अनेक वेळा विनंती करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. मनमाड रस्त्याच्या दुरवस्थेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना न्याय मिळावा यासाठी मी आजपासून बेमुदत उपोषणाला बसलो आहे. जोपर्यंत काम सुरू होत नाही, तोपर्यंत मी हे आंदोलन मागे घेणार नाही.