KL Rahul Record at Lords | भारताचा सलामीवीर फलंदाज केएल राहुलने (KL Rahul Record at Lords) लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध (Ind vs Eng) तिसऱ्या कसोटीत शानदार शतक ठोकत इतिहास रचला आहे. राहुलने 176 चेंडूंमध्ये 13 चौकारांच्या जोरावर हे शतक पूर्ण केले.
या कामगिरीने तो लॉर्ड्सवर दोन कसोटी शतके झळकावणारा दुसरा भारतीय फलंदाज बनला आहे. यासोबतच, त्याने आता सचिन तेंडुलकरच्या खास क्लबमध्येही प्रवेश मिळवला आहे.
लॉर्ड्सवरील दुसरे शतक
केएल राहुलने लॉर्ड्सच्या मैदानावर आपली संयमी आणि शिस्तबद्ध फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. पहिल्या दिवसअखेरीस तो 53 धावांवर नाबाद होता. दुसऱ्या दिवशी त्याने ऋषभ पंतसोबत चौथ्या विकेटसाठी 141 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली, पण पंत 74 वर धावबाद झाल्यावर राहुलने संयमपणे खेळत राहिला.
176 चेंडूंमध्ये 13 चौकारांसह शतक पूर्ण करताना तो दिलीप वेंगसरकर यांच्यानंतर हा विक्रम करणारा दुसरा भारतीय फलंदाज बनला. लॉर्ड्सवर एकापेक्षा अधिक शतक ठोकणारा राहुल हा केवळ दुसरा भारतीय फलंदाज आहे. वेंगसरकर यांच्या नावावर लॉर्ड्सवर तीन शतके आहेत.
SENA क्लबमध्ये सहावा भारतीय
राहुल आता SENA (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये 10 किंवा अधिक शतके झळकावणारा सहावा भारतीय फलंदाज ठरला आहे.
यादीत सचिन तेंडुलकर (26), विराट कोहली (22), रोहित शर्मा (15), राहुल द्रविड (13) आणि सौरव गांगुली (13) यांच्यापाठोपाठ त्याचे नाव आता 10 शतकांसह झळकले आहे. ही कामगिरी त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
हे देखील वाचा –