बंगळुरु – आपल्या सहा दशकांच्या कारकिर्दीत २०० हून अधिक चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारलेल्या ज्येष्ठ दाक्षिणात्य अभिनेत्री सरोजा देवी (Veteran actress B Saroja Devi)यांचे आज बंगळुरु येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. त्या ८७ वर्षांच्या होत्या. आज सकाळी सरोजा देवी आपल्या मल्लेश्वरम (Malleswaram) येथील निवासस्थानी बेशुद्ध अवस्थेत आढळल्या. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना खाजगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

बी. सरोजा देवी यांनी आपल्या ७० वर्षांच्या कारकिर्दीत २०० हून अधिक कन्नड, तमिळ, तेलगू (Tamil cinema)व हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. १९५५ साली वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी कन्नड चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. १९५८ साली आलेल्या नादोदी मन्नान चित्रपटात त्यांनी एमजी रामचंद्रन (M.G. Ramachandran)यांच्याबरोबर भूमिका केली होती. कन्नड सिनेमातील अभिजात चित्रपट समजण्यात येणाऱ्या महाकवी कालिदास चित्रपटातील त्यांची भूमिकाही गाजली होती. १९५९ साली आलेल्या पैगाम या हिंदी चित्रपटात त्यांनी दिलीप कुमार यांच्याबरोबर भूमिका केली. ससुराल, प्यार किया तो डरना क्या, बेटी बेटे हे त्यांचे हिंदी चित्रपटही गाजले. एमजी रामचंद्रन यांच्या बरोबर त्यांनी तब्बल २६ चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. त्यांना पद्मश्री व पद्मभूषणसह अनेक पुरस्कारांनीही (National Award)गौरवण्यात आले होते. प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी एक्सवर लिहिले आहे की, सरोजा देवी यांनी कोट्यवधी रसिकांच्या हृदयावर राज्य केले. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. (May her soul rest in peace