शिंदे-रिपब्लिकन सेनेची युती! शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र

Alliance Between Shiv Sena and Republican Sena

मुंबई – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Deputy Chief Minister Eknath Shinde) यांच्या शिवसनेने आणि आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांच्या रिपब्लिकन सेना पक्षाने आज युती केली. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या या युतीची घोषणा आज दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली. या युतीमुळे राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन्ही पक्षांनी कार्यकर्त्यांच्या सत्तासहभागाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत नवीन राजकीय दिशा देण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, लोकांच्या भल्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. शिवसेना आणि रिपब्लिकन सेना या दोन्ही सेना अन्यायाविरुद्ध रस्त्यावर लढणाऱ्या आहेत. यातील एक सेना बाळासाहेबांच्या विचारांचा (Balasaheb Thackeray’s thoughts) वारसा घेऊन चालणारी असून दुसरी सेना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedka)यांच्या रक्ताचा वारसा घेऊन चालणारी आहे. बाळासाहेब ठाकरे नेहमी आपल्या कार्यकर्त्याला सवंगडी समजा, असे सांगत. पण काही लोक कार्यकर्त्याला घरगडी समजायचे. नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. तसेच सर्व कार्यकर्त्यांना सत्तेचा लाभ मिळाला पाहिजे. विचार, विकास आणि विश्वास हा एकच आमचा अजेंडा आहे.

आनंदराज आंबेडकर म्हणाले की, बाबासाहेब आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासूनच शिवशक्ती-भीमशक्ती युती सुरू झाली होती. कनाथ शिंदे यांचा मी कार्यकर्ता म्हणून उल्लेख करतो. कारण मुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीतदेखील ते मुख्यमंत्री म्हणून वागले नाहीत, तर कार्यकर्ता म्हणून त्यांनी कायम काम केले. कोणत्याही अटी न ठेवता आम्ही ही युती करत आहोत.