Devendra Fadnavis on Maharashtra Assembly Fight | सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्रातील अधिवेशनाद रम्यान दोन आमदारांचे खासदार विधानभवनातच एकमेकांना भिडल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि भाजपचे गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार संघर्ष झाला, ज्यामुळे सभागृहात गोंधळ निर्माण झाला. या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली असून, अशी घटना योग्य नसल्याचे म्हटले आहे.
विधानसभा परिसरातील कार्यकर्त्यांच्या हाणामारीच्या (Maharashtra Assembly Fight) घटनेवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, विधिमंडळच्या पवित्र प्रांगणात हाणामारी होणं अत्यंत चुकीचं आहे. अशा प्रकारची घटना घडणं शोभनीय नाही. हे प्रांगण विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती यांच्या अधिकारक्षेत्रात येतं.
या घटनेची गंभीर दखल घेतली असून. मी कडक कारवाईची मागणी केली आहे,” असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. त्यांनी असेही नमूद केले की, मोठ्या संख्येनं लोक जमा होऊन मारामारी करणं विधानसभेला शोभत नाही आणि यावर निश्चित कारवाई होईल.
दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली आहे. “हे कार्यकर्ते आहेत की गुंड? जर विधानभवनात अशी मारामारी होत असेल, तर हे गंभीर आहे. पास देणाऱ्यांवर आणि त्यांच्या पोशिंद्यांवर कारवाई होईल,” असं ते म्हणाले.
कठोर कारवाई होणार
गेल्याकाही दिवसांपासून जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळत होती. अखेर त्याचे रुपांतर दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या हाणामारीत झाले. या घटनेनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कठोर कारवाई केली जाणार असल्याचे म्हटले. संबंधित अहवाल आल्यावर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया
या घटनेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितलं की, पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. “मी सभागृहात भाषणानंतर मोकळी हवा घ्यायला बाहेर आलो, तेव्हा गुंडांनी माझ्यावर थेट हल्ला केला. माझा कार्यकर्ता नितीन देशमुख याला मारहाण आणि शिवीगाळ झाली. जर विधानसभेत गुंडांना प्रवेश दिला, तर आमचे लोक सुरक्षित नाहीत,” असा दावा त्यांनी केला. या प्रकरणानं त्यांच्यातील तणाव आणखी वाढला आहे.
दरम्यान, गोपीचंद पडळकर यांनी या घटनेला दुर्दैवी ठरवलं आहे. “विधानभवनात घडलेली ही घटना मला दुःखद वाटते. मी माझ्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून पुढील प्रतिक्रिया देईन,” असं ते म्हणाले. त्यांनी मुख्यमंत्री आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची भेटही घेतली आहे.