Tata Sons Welfare Fund | अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया AI-171 विमान अपघातातील (Air India Plane Crash) पीडितांच्या मदतीसाठी टाटा सन्सने मुंबईत AI-171 मेमोरियल अँड वेल्फेअर ट्रस्ट (AI-171 Memorial and Welfare Trust) नावाचा सार्वजनिक धर्मादाय ट्रस्ट स्थापन केला आहे.
काही दिवसांपूर्वी झालेल्या या विमान अपघातात 260 लोकांचा मृत्यू झाला होता. आता या ट्रस्टद्वारे मृतांच्या कुटुंबीयांसह जखमी आणि प्रभावितांना मदत मिळणार आहे. टाटा सन्स आणि टाटा ट्रस्ट्सने (Tata Sons Plane Crash Welfare Fund) यासाठी एकूण 500 कोटी रुपयांचा निधी देण्याचं वचन दिलं आहे, जो वैद्यकीय उपचार आणि पायाभूत सुविधांच्या पुनर्बांधणीसाठी वापरला जाईल.
ट्रस्टची नोंदणी
या ट्रस्टची नोंदणी मुंबईत पूर्ण झाली असून, त्याचा उद्देश मृतांचे कुटुंबीय, जखमी आणि अपघाताने बाधित झालेल्यांना तातडीची आणि दीर्घकालीन मदत देणं आहे. याशिवाय, मदतकार्य करणाऱ्या प्रथमोपचारक, वैद्यकीय व्यावसायिक, समाजसेवक आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा मानसिक त्रास कमी करण्यासाठीही प्रयत्न केले जातील.
ट्रस्ट 5 सदस्यांच्या विश्वस्त मंडळाने चालवला जाईल, ज्यामध्ये टाटा समूहाचे सदस्य एस. पद्मनाभन आणि टाटा सन्सचे जनरल कौन्सिल सिद्धार्थ शर्मा यांचा समावेश आहे. उर्वरित दोन सदस्यांची नियुक्ती लवकरच होईल.
500 कोटी रुपयांची करणार मदत
500 कोटींपैकी टाटा सन्स आणि टाटा ट्रस्ट्स प्रत्येकी 250 कोटी रुपये देणार आहेत. या निधीतून मृतांच्या कुटुंबांना 1 कोटी रुपये मदत, गंभीर जखमींना पूर्ण वैद्यकीय उपचार आणि बी.जे. मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या पुनर्बांधणीसाठी निधी वापरला जाईल. या पुढाकाराने अपघातग्रस्तांच्या पुनर्वसनाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
दरम्यान, एअर इंडियाचं AI-171 विमान अहमदाबादहून लंडनकडे निघालं होतं, पण उड्डाणानंतर अवघ्या 30 सेकंदात कोसळले. दुया दुर्घटनेत विमानातील 241 आणि जमिनीवरच्या 19 जणांचा मृत्यू झाला. एअर इंडियाने लगेचच सोशल मीडियावर ही माहिती दिली होती. प्राथमिक अहवालानुसार, उड्डाणानंतर इंजिनच्या इंधन स्विच कटऑफ झाल्याने हा अपघात झाला असावा, पण याचा तपास अजूनही सुरू आहे.
हे देखील वाचा –