Best Phone under 10000 | तुम्ही कमी बजेटमध्ये एक दमदार 5G स्मार्टफोन शोधत असाल, तर Tecno कंपनीने नुकताच सादर केलेला Tecno Pop 9 5G तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.
टेक्नोच्या या फोनवर (Best Phone under 10000) शानदार ऑफरसह उपलब्ध आहे. Amazon India वर या फोनची किंमत 9,699 रुपये असून, बँक ऑफरमुळे हा फोन 9,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येऊ शकतो. यावर 484 रुपयांपर्यंत कॅशबॅक आणि एक्सचेंज ऑफरही मिळते.
हा फोन 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह येतो. यामध्ये 8GB व्हर्च्युअल RAM जोडल्यास एकूण 16GB RAM मिळतो, त्यामुळे हे डिव्हाईस गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी एकदम योग्य आहे.
Tecno Pop 9 5G चे खास फीचर्स:
डिस्प्ले: Tecno Pop 9 5G मध्ये 6.6 इंचाचा HD+ डिस्प्ले दिला आहे, ज्याचे रेझोल्यूशन 1612×720 पिक्सल आहे. या डिस्प्लेला 120Hz चा रिफ्रेश रेट सपोर्ट मिळतो, त्यामुळे पाहण्याचा अनुभव अधिक स्मूथ आणि आकर्षक होतो.
परफॉर्मन्स आणि स्टोरेज: हा फोन 16GB पर्यंत रॅमसह येतो, ज्यामध्ये 8GB प्रत्यक्ष रॅम आणि 8GB व्हर्च्युअल रॅमचा समावेश आहे. त्यामुळे मल्टीटास्किंग आणि गेमिंगसाठी हा फोन उपयुक्त ठरतो. यामध्ये 128GB पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळते.
प्रोसेसर: दमदार कामगिरीसाठी यामध्ये Dimensity 6300 हा प्रोसेसर दिला आहे, जो 5G कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतो.
कॅमेरा: उत्तम फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल LED फ्लॅशसह दोन कॅमेरे दिले आहेत. यातील मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सलचा असून, त्यासोबत एक सेकंडरी एआय लेन्स दिली आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
बॅटरी आणि चार्जिंग: Tecno Pop 9 5G मध्ये 5000mAh क्षमतेची मोठी बॅटरी आहे, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
सुरक्षितता आणि ऑडिओ: बायोमेट्रिक सुरक्षेसाठी फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. आवाजासाठी स्टीरिओ स्पीकर्ससोबत डॉल्बी ॲटमॉसचा सपोर्ट मिळतो.
सॉफ्टवेअर आणि कनेक्टिव्हिटी: हा फोन अँड्रॉइड 14 वर आधारित HiOS 14 प्रणालीवर काम करतो. कनेक्टिव्हिटीसाठी 5G, ड्युअल 4G VoLTE, Wi-Fi, ब्लूटूथ, जीपीएस, USB टाइप-C, NFC आणि 3.5mm हेडफोन जॅक यांसारखे सर्व महत्त्वाचे पर्याय उपलब्ध आहेत.
हे देखील वाचा –
मेटाकडून भाषांतरात मोठी चूक, थेट मुख्यमंत्र्यांनाच मृत घोषित केले; आता मागितली माफी