शूटिंगदरम्यान शाहरुख जखमी ! उपचारासाठी अमेरिकेला रवाना

Shah Rukh Khan injured

मुंबई – बॉलीवूडचा अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) आपल्या आगामी चित्रपटा किंग (King) चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान जखमी (injured)झाला. मुंबईतील गोल्डन टोबॅको स्टुडिओ (Golden Tobacco studio) येथे अ‍ॅक्शन सीनच्या चित्रीकरणादरम्यान त्याच्या स्नायूंवर ताण आल्याने ही दुखापत झाली. या दुखापतीनंतर शाहरुख खान अमेरिकेत उपचारासाठी रवाना झाला.

डॉक्टरांनी शाहरुख खानला किमान एक महिन्याच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. स्टंट करताना शाहरुख खानच्या स्नायूंना यापूर्वीही अनेक वेळा दुखापत झाली आहे. किंग हा चित्रपट २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ आनंद (siddharth anand)दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख खानची मुलगी सुहाना खानही (suhana khan) दिसणार आहे. त्यात दीपिका पदुकोण (Deepika Padukone), अभिषेक बच्चन, राणी मुखर्जी, अनिल कपूर (Anil Kapoor ) हे कलाकारही आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण फिल्मसिटी, गोल्डन टोबॅको स्टुडिओ आणि यशराज स्टुडिओमध्ये चालू आहे. पण शाहरुख खानला दुखापत झाल्याने हे चित्रीकरण पुढे ढकलण्यात आले आहे. सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होण्याची शक्यता आहे.