अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामांना अटक? ट्रम्प यांनी शेअर केला AI व्हिडिओ, प्रकरण काय?

Donald Trump Shares Barack Obama AI Video

Donald Trump Shares Barack Obama AI Video | अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) पुन्हा एकदा एकदा चर्चेत आहेत. यावेळी त्यांनी थेट माजी राष्ट्रपती बराक ओबामांवर (Barack Obama) निशाणा साधला असून, FBI अधिकारी ओबामांना व्हाइट हाऊसमधील ओव्हल ऑफिसमध्ये अटक करताना दाखवणारा एक AI जनरेटेड व्हिडीओ (AI Video) शेअर केला आहे.

ट्रम्प यांच्या Truth Social प्लॅटफॉर्मवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओवर अमेरिकेत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

“कोणीही कायद्याच्या वर नाही,” या कॅप्शनसह शेअर केलेला हा व्हिडीओ डीपफेक तंत्रज्ञानाने बनवण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विरोधकांनी यावर टीका करताना हा व्हिडीओ ‘भडकावणारा’ असल्याचं म्हटलं असून, काहींनी हे Jeffrey Epstein प्रकरणावरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न असल्याचंही नमूद केलं.

व्हिडीओत नेमकं आहे काय?

व्हिडीओची सुरुवात ओबामांच्या एका जुन्या विधानाने होते. ज्यात ते “कोणीही, अगदी राष्ट्रपतीसुद्धा कायद्याच्या वर नाही.”, असे म्हणत आहे. त्यानंतर अनेक डेमोक्रॅट नेत्यांची वाक्य एकामागोमाग दाखवली जातात, जसे की जो बायडेन, कमला हॅरिस जे हेच विधान पुन्हा करताना दिसतात.

त्यानंतर व्हिडीओमध्ये FBI एजंट ओव्हल ऑफिसमध्ये ओबामांना अटक करताना दाखवण्यात आले आहे, आणि ट्रम्प बाजूला उभे राहून हास्य करताना दिसतात. काही सेकंदांनी ओबामा तुरुंगातील पोशाखात आणि तुरुंगाच्या मागे उभे असल्याचं दाखवलं जातं.

ओबामा-ट्रम्प यांच्यात पुन्हा संघर्ष

या व्हिडीओचा काळही विशेष लक्षवेधी आहे. ट्रम्प प्रशासनाच्या गुप्तचर प्रमुख असलेल्या तुलसी गॅबार्ड यांनी नुकतंच ओबामांवर 2016 मधील निवडणूक निकालात हस्तक्षेप केल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ओबामांच्या काळातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ट्रम्प यांचा विजय रशियाच्या हस्तक्षेपामुळे झाल्याचे चुकीचे गुप्तचर निष्कर्ष तयार केले.

त्यानंतर ट्रम्प यांनीही ओबामा आणि त्यांच्या कार्यकाळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. विशेष म्हणजे याच वर्षी जानेवारीत माजी राष्ट्रपती जिमी कार्टर यांच्या अंत्यसंस्कारात ट्रम्प आणि ओबामा एकमेकांशी मैत्रीपूर्ण संवाद करताना दिसले होते.

Share:

More Posts