Ahmedabad Crash| बोईंगच्या स्विचमध्ये दोष नाही; एअर इंडियाकडून तपासणी

Air India Finds No Fault In Boeing Fuel Switches


नवी दिल्ली – अहमदाबादमधील बोईंग ड्रीमलायनर विमानाला (Ahmedabad Boeing Dreamliner plane crash) झालेल्या भीषण अपघातानंतर नागरी विमान उड्डाण महासंचलनालयाच्या (DGCA) आदेशानुसार एअर इंडियाने (Air India) आपल्या ताफ्यातील सर्व बोईंग ७८७ (Boeing 787) आणि बोईंग ७३७ (Boeing 737) विमानांच्या इंधन नियंत्रण स्विचच्या लॉकिंग प्रणालीची कसून तपासणी केली. त्यामध्ये कोणताही दोष आढळून आलेला नाही, असे एअर इंडियाने म्हटले आहे.


अहमदाबादमधील अपघातानंतर एअर इंडियाने स्वतःहून विमानांच्या इंधन स्विचच्या लॉकिंग प्रणालीची तपासणी सुरू केली होती. हे काम सुरू असताना १४ जुलै डीजीसीएचे आदेश आले. त्यानुसार सर्व बोईंग विमानांची कालबध्द तपासणी करून डीडीसीएला सादर करण्यात आला आहे.


नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने (Ministry of Civil Aviation) एअर इंडिया विमान अपघाताच्या चौकशीचा प्राथमिक अहवाल काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केला होता. एअर इंडियाच्या बोईंग ७८७ विमानाच्या दोन्ही इंजिनांना इंधन पुरवठा उड्डाणानंतर अवघ्या तीन सेकंदात थांबला होता. विमानाच्या फ्युएल कंट्रोल स्विच काही सेकंदांतच रनवरून कटऑफवर गेले होते. त्यामुळे स्विच बंद असल्याने इंजिनपर्यंत इंधन पोहोचू शकले नाही आणि त्यातून हा अपघात घडल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.