Home / लेख / 20 हजारांच्या बजेटमध्ये आला दमदार स्मार्टफोन, 5700mAh बॅटरी-12 जीबी रॅमसह मिळतील शानदार फीचर्स

20 हजारांच्या बजेटमध्ये आला दमदार स्मार्टफोन, 5700mAh बॅटरी-12 जीबी रॅमसह मिळतील शानदार फीचर्स

iQOO Z10R 5G Detailes: iQOO ने आपला नवीन स्मार्टफोन iQOO Z10R 5G भारतात लाँच केला आहे. यात नवीनमीडियाटेक डायमेंसिटी 7400...

By: Team Navakal
iQOO Z10R 5G Detailes

iQOO Z10R 5G Detailes: iQOO ने आपला नवीन स्मार्टफोन iQOO Z10R 5G भारतात लाँच केला आहे. यात नवीनमीडियाटेक डायमेंसिटी 7400 प्रोसेसर दिला असून, याची किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे.

यामध्ये 12 जीबी रॅमसह अनेक शानदार फीचर्स दिले आहेत. iQOO Z10R 5G च्या किंमत आणि फीचर्सविषयी जाणून घेऊया.

iQOO Z10R 5G ची वैशिष्ट्ये

  • प्रोसेसर: मीडियाटेक डायमेंसिटी 7400 चिपसेट (ऑक्टा कोअर चिपसेट, स्पीड 2.6 गिगाहर्ट्झ)
  • रॅम आणि स्टोरेज: 12 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंत स्टोरेज उपलब्ध. व्हर्च्युअल मेमरी फीचर वापरून रॅम आणखी 12 जीबी पर्यंत वाढवता येते.
  • डिस्प्ले: क्वाड-वक्र एमोलेड पॅनेल, 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट सपोर्ट करतो.
  • डिझाइन आणि टिकाऊपणा: फोन पॉलिकार्बोनेटपासून बनवला आहे. चमकदार पॉलिकार्बोनेट बाजू आणि मॅट फिनिश असलेली बॅक सूक्ष्म ग्रेडियंट फिनिश देते. आयपी68 आणि आयपी69 रेटिंगमुळे फोन खूप टिकाऊ आहे.
  • कॅमेरा (रियर): सोनी आयएमएक्स882 50 मेगापिक्सल सेन्सर, 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर आणि ऑरा लाइट सेल्फी रिंग दिली आहे.
  • कॅमेरा (फ्रंट): फोनमध्ये फ्रंट कॅमेरा 32 मेगापिक्सल आहे.
  • बॅटरी: 5700 एमएएच असून, फास्ट चार्जिंग सपोर्ट करतो.
  • सॉफ्टवेअर: फोन अँड्रॉइड 15 वर आधारित फनटच ओएस 15 वर चालतो.
  • एआय फीचर्स: गुगलचे सर्कल टू सर्च, एआय नोट असिस्ट, एआय स्क्रीन ट्रान्सलेशन आणि रेकॉर्डिंगसाठी एआय ट्रान्सक्रिप्शन असिस्ट यांचा समावेश आहे.

iQOO Z10R 5G ची भारतातील किंमत आणि उपलब्धता

  • 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज मॉडेल: लाँच ऑफर 17,499 रुपये (मूळ किंमत 19,499 रुपये). 2,000 रुपयांची तात्काळ बँक सवलत उपलब्ध आहे.
  • 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज मॉडेल: किंमत 21,499 रुपये.
  • 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज मॉडेल): किंमत 23,499 रुपये

या तिन्ही मॉडेल्सवर 2 हजार रुपयांपर्यंत ऑफरचा लाभ मिळेल. ज्यामुळे फोनची किंमत अजून कमी होते. फोनची विक्री 29 जुलैला सुरू होईल.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या

Share:

More Posts