Home / देश-विदेश / अश्लील कंटेंटला चाप! सरकारने ‘सॉफ्ट पॉर्न’ दाखवणाऱ्या ‘या’ 25 ॲप्सवर घातली बंदी

अश्लील कंटेंटला चाप! सरकारने ‘सॉफ्ट पॉर्न’ दाखवणाऱ्या ‘या’ 25 ॲप्सवर घातली बंदी

Government Bans Ullu ALTT apps: देशभरातून वाढणाऱ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 25 स्ट्रीमिंग ॲप्स आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर (Government Bans Ullu...

By: Team Navakal
Government Bans Ullu ALTT apps

Government Bans Ullu ALTT apps: देशभरातून वाढणाऱ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 25 स्ट्रीमिंग ॲप्स आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर (Government Bans Ullu ALTT apps) बंदी घातली आहे. या ॲप्सवर प्रौढांसाठी असलेल्या अश्लील आणि लैंगिकदृष्ट्या आक्षेपार्ह वेब सिरीज किंवा व्हिडिओ क्लिप्स प्रसारित केल्या जात असल्याचा आरोप होता.

‘सॉफ्ट पॉर्न’द्वारे कायद्याचा भंग

रिपोर्टनुसार, हे ॲप्स ‘सॉफ्ट पॉर्न’ स्वरूपातील कंटेंट प्रसारित करत होते, जो देशातील माहिती तंत्रज्ञान कायदा आणि अश्लीलता प्रतिबंधक कायद्यांचे उल्लंघन ठरत होता.

बंदी घालण्यात आलेल्या ॲप्समध्ये उल्लू (Ullu App), ALTT App, देसीफ्लिक्स, बिग शॉट्स, बूमेक्स, गुलाब ॲप, कंगन ॲप, जलवा ॲप, हिटप्राईम, फेनिओ, शोएक्स, सोल टॉकीज, अड्डा टीव्ही, हॉटएक्स व्हीआयपी, हलचल ॲप, मूडएक्स, फुगी, मोजफ्लिक्स, ट्रायफ्लिक्स यांचा समावेश आहे.

हे ॲप्स ‘इरॉटिक वेब सिरीज’च्या नावाखाली अश्लील दृश्ये प्रदर्शित करत असून त्यात योग्य कंटेंट मॉडरेशनचाही अभाव असल्याचे आढळून आले.

या निर्णयाबाबत माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हटले आहे की, माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 आणि 2021 मधील तरतुदीनुसार विविध इंटरनेट सेवा पुरवठादारांना ही ॲप्स आणि वेबसाइट्स ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामागे गृह मंत्रालय, महिला आणि बालविकास मंत्रालय, कायदेशीर व्यवहार विभाग, उद्योग संस्था आणि हक्क संस्थांची सल्लामसलत घेण्यात आली होती.

पूर्वीही झाली होती कारवाई

या कारवाईपूर्वी मार्च महिन्यातही सरकारने 19 वेबसाइट्स, 10 ॲप्स आणि 18 ओटीटी प्लॅटफॉर्मशी संबंधित 57 सोशल मीडिया हँडल्सवर बंदी घातली होती. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अशा प्लॅटफॉर्म्सवर अश्लीलता, असभ्य भाषा आणि पोर्नोग्राफिक प्रकारचे व्हिडीओ प्रसारित होत असल्याने ही कारवाई केली होती.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या