2027 Nashik Kumbh Mela: 2027 मध्ये होणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी (2027 Nashik Kumbh Mela) रेल्वे मंत्रालयाने कंबर कसली आहे. प्रयागराज महाकुंभपर्वाच्या धर्तीवर, नाशिकच्या कुंभमेळ्यात मागील वेळेपेक्षा 50 पट अधिक म्हणजे तब्बल 3 कोटी भाविक सहभागी होण्याचा अंदाज आहे. या प्रचंड गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि भाविकांना सुलभ प्रवास प्रदान करण्यासाठी रेल्वेने मोठ्या योजना आखल्या आहेत.
रेल्वे मंत्रालयाची जय्यत तयारी
नुकतेच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री रवनील सिंह बिंदू (रवनीत सिंह बिट्टू) यांच्या उपस्थितीत झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत या योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. देशभरातून नाशिककडे येणाऱ्या भाविकांसाठी लांब पल्ल्याच्या विशेष गाड्या आणि कमी अंतराच्या मेमू (MEMU) सेवा देण्याची तयारी रेल्वेने केली आहे.
या गाड्या कामाख्या, हावडा, पटना, दिल्ली, जयपूर, बिकानेर, मुंबई, पुणे, नागपूर आणि नांदेड यांसारख्या महत्त्वाच्या रेल्वे स्टेशन्सला थेट नाशिकशी जोडतील.
तीन ज्योतिर्लिंगांना जोडणारी ‘सर्किट ट्रेन’
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यात भाविकांना 3 ज्योतिर्लिंगांना एकाचवेळी भेट देता यावी, यासाठी एक विशेष ‘सर्किट’ रेल्वेगाडी चालवली जाणार आहे. ही गाडी त्र्यंबकेश्वर (नाशिक), घृष्णेश्वर (छत्रपती संभाजीनगर) आणि ओंकारेश्वर (मध्यप्रदेशातील नर्मदा नदीच्या काठी) या तीन ज्योतिर्लिंगांना जोडेल.
स्थानकांची क्षमता वाढवणे आणि पायाभूत सुविधांचा विकास
कुंभमेळ्यादरम्यान रेल्वे स्थानकांवर होणाऱ्या प्रचंड गर्दीचे व्यवस्थापन करणे हे एक मोठे आव्हान आहे. भाविकांची ये-जा सुकर व्हावी यासाठी प्रत्येक स्थानकांवर प्रवाशांना थांबण्यासाठी मोठी जागा उपलब्ध राहील, असे नियोजन केले जात आहे. रेल्वे विभाग व्यापक पायाभूत सुविधा आणि परिचालन सुधारणा हाती घेणार आहे. नाशिकजवळील नाशिक रोड, देवळाली, ओढा, खेरवाडी आणि कसबे सुकेणे या 5 महत्त्वाची स्थानकांवर प्रवासी वाहतुकीचे व्यवस्थापन केले जाईल.
या स्थानकांवरील प्रस्तावित पायाभूत सुविधांच्या कामांसाठी 1,011 कोटी रुपयांहून अधिक खर्च अपेक्षित आहे. याव्यतिरिक्त, सर्व 5 स्थानकांवर फलाटांवर छत, पाण्याच्या टाक्या, नवीन शौचालये आणि वॉटरप्रूफ होल्डिंग एरिया यांसारख्या विविध प्रवासी सुविधा विकसित करण्याचे नियोजन आहे. सर्क्युलेटिंग एरिया, मार्ग, प्रवेश/निर्गमन रस्ते आणि प्रवासी माहिती प्रणाली देखील अद्ययावत केल्या जातील.
गर्दी व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञानाचा वापर
गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी एक केंद्रीकृत कमांड आणि नियंत्रण केंद्र स्थापन करण्याचा मानस आहे. हे केंद्र प्रभावी देखरेखीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि अंदाजे वेळापत्रकासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) साधनांनी सुसज्ज असणार आहे. रे