Home / महाराष्ट्र / Saif Ali Khan attack| सैफच्या हल्लेखोराविरूध्द पोलिसांकडे भक्कम पुरावा

Saif Ali Khan attack| सैफच्या हल्लेखोराविरूध्द पोलिसांकडे भक्कम पुरावा

मुंबई- अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan attack) याच्यावर हल्ला करणारा शरीफूल फकीर (Shariful Fakir) याच्याविरोधात भक्कम पुरावा असल्याचा...

By: Team Navakal
Strong evidence available against Saif Ali Khan attacker


मुंबई- अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan attack) याच्यावर हल्ला करणारा शरीफूल फकीर (Shariful Fakir) याच्याविरोधात भक्कम पुरावा असल्याचा दावा करत मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) त्याच्या जामिनाला विरोध केला. आता त्याच्या जामीन अर्जावर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे.


सैफच्या घरातून मिळालेले बोटांचे ठसे आरोपी फकीरच्या बोटाच्या ठशांशी जुळले आहेत.सीसीटिव्ही (CCTV) फुटेजमध्ये फकीर सैफच्या इमारतीमध्ये वावरताना दिसत आहे.सैफवर हल्ला करून पळून जातानाचे फकीरचे सीसीटिव्ही फुटेजही मिळाले आहे. हे फुटेज चेहरा ओळखण्यासाठी (Face recognition) न्याय वैद्यक प्रयोगशाळेकडे (Forensic Lab) पाठविण्यात आले आहे.त्याचबरोबर सैफच्या शरीरात आढळलेले चाकूचे तुकडे आणि घरात सापडलेला चाकूचा उर्वरित भाग तंतोतंत जुळत आहेत. सबब आरोपीविरूध्द आमच्याकडे भक्कम पुरावे आहेत,असा दावा पोलिसांच्या वतीने न्यायालयात (Court) करण्यात आला आहे.

Web Title:
संबंधित बातम्या