परमबीर सिंग यांना १ कोटी खंडणी प्रकरणात क्लीन चीट

Former Mumbai Police Commissioner Parambir Singh

मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Former Mumbai Police Commissioner Parambir Singh)यांना खंडणीप्रकरणी क्लीन चीट (clean chit) मिळाली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi government’) काळात त्यांच्या विरोधात दाखल झालेल्या पाच गुन्ह्यांपैकी तीन प्रकरणांमध्ये दिलासा (relief) मिळाला आहे.

२०१८ मध्ये बुकी व व्यावसायिक केतन तन्ना (businessman Ketan Tanna) याच्याकडून एक कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप सिंग यांच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) सिंग यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते. पण या तपासादरम्यान ठोस पुरावे आढळून आले नाहीत असे सीबीआयने स्पष्ट केले आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात परमबीर सिंग यांच्यावर एकूण पाच गुन्हे दाखल (five total cases filed)करण्यात आले होते. यापैकी कोपरी आणि बाजारपेठ पोलीस ठाण्यात (Bazaar Peth police stations)स्वतंत्रपणे दोन गुन्ह्यांची नोंद झाली होती. ही दोन्ही प्रकरणे सीबीआयकडे वर्ग (transferred)करण्यात आली होती. तपासाअंती सीबीआयला या प्रकरणांत कोणतीही तथ्ये किंवा पुरावे न सापडल्याने, सीबीआयने दोन आठवड्यांपूर्वी संबंधित न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. दरम्यान, मविआ काळात दाखल करण्यात आलेली आणखी दोन प्रकरणे (two other cases) अद्याप प्रलंबित आहेत.