नाशिकमध्ये जीएसटी पथकाचा अभियंत्याच्या घरावर छापा

GST Intelligence Team

नाशिक – नाशिक शहरातील देवळाली (Deolali)परिसरात आज जीएसटी विभागाच्या पुणे येथील गुप्तचर यंत्रणेने (GST Intelligence Unit in Pune)संगणक अभियंत्याच्या (software engineer) घरावर छापा (raid) टाकला. बनावट सॉफ्टवेअर तयार करून शासनाची फसवणूक केल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

छाप्यादरम्यान तपास अधिकारी कागदपत्रांची (documents)छाननी करत असताना कपाटात एक पिस्तूल (pistol)आणि सहा जिवंत राऊंड (six live rounds)सापडले. त्यामुळे आर्थिक फसवणुकीसोबतच शस्त्र बाळगण्याच्या गंभीर गुन्ह्याचाही (arms-related charges)तपास सुरू करण्यात आला आहे.

संबंधित सॉफ्टवेअर कंपनीने विविध आयटी सेवा (IT services) पुरवठा केल्याचा दाखला देऊन बनावट बिले तयार केली. यातून शासनाची कोट्यवधी रुपयांची जीएसटी (multi-crore GST evasion)चोरी केल्याचा संशय आहे. या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांची व कागदपत्रांची कसून तपासणी करण्यात आली आहे.छाप्यात कंपनीचे संगणक(computers), सर्व्हर, हार्डडिस्क(hard drives,), पेनड्राईव्ह आणि आर्थिक व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली.