आ. संजय गायकवाडांचे नाटकच ! जेवण खराब नसल्याचा अहवाल

MLA Sanjay Gaikwad on Ladki Bahin Yojana


मुंबई – मुंबईतील आकाशवाणी आमदार (Akashvani MLA Hostel) निवासातील कॅंटीनमध्ये आमदार संजय गायकवाड यांनी जेवण खराब असल्याचा आरोप करत टॉवेल व बनियनवर सेवकाला मारहाण केली होती. मात्र हे जेवण शिळे नसून खाण्यायोग्य होते, असा निर्वाळा राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे. या जेवणाचे नमुने (Food samples)घटनेनंतर ताबडतोब घेण्यात आले होते.

आकाशवाणी आमदार निवासातील कॅंटीनमध्ये ९ जुलै रोजी रात्रीच्या जेवणात आलेली डाळ खराब असल्याचा आरोप आमदार संजय गायकवाड (MLA Gaikwad claimed) यांनी केला होता. यावेळी उपहारगृहात (canteen) मोठा गोंधळ झाला होता. त्यानंतर काही दिवस हे कँटिन बंद करण्यात आले होते.


राज्य अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी (FDA officials said) म्हटले आहे की, गायकवाड यांनी डाळ, भात व चपाती (dal, rice, and chapati)मागवली होती. पहिला घास घेताच त्यांनी डाळ निकृष्ट असल्याची तक्रार केली होती. प्रयोगशाळेत या जेवणाची तपासणी केल्यानंतर हे जेवण योग्य (safe and consumable) असल्याचे आढळले. दरम्यान, या उपहारगृहाने अन्न सुरक्षेच्या तब्बल १९ नियमांचे उल्लंघन केल्याचेही प्रशासनाने म्हटले आहे.

स्वयंपाकघर, त्याची रचना, सांडपाण्याच्या निचऱ्याची योग्य व्यवस्था नसणे, कर्मचाऱ्यांनी व्यक्तिगत स्वच्छता न बाळगणे (hygiene), त्याचप्रमाणे अन्नपदार्थांच्या नोंदी व्यवस्थित न ठेवणे अशा अनेक त्रुटी आढळल्याचेही प्रशासनाने म्हटले आहे. या उपहारगृहासाठीचे अंजता कॅटरर यांचे कंत्राट तातडीने रद्द करची सूचनाही प्रशासनाच्या आयुक्तांनी दिली आहे. यापुढे सर्व सरकारी उपहारगृहांमध्ये अचानक तपासणी करण्यात येणार असल्याचे अन्न प्रशासनाने (Food and Drug Administration) म्हटले आहे.