Home / देश-विदेश / गोव्यात पारंपरिक मच्छिमारांचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

गोव्यात पारंपरिक मच्छिमारांचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

वास्को – मासेमारी बंदीच्या काळात मासेमारी होत असल्यानेमत्स्योद्योग खात्याने (Fisheries Department) पारंपरिक मच्छीमारांना (fishermen) कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे...

By: Team Navakal

वास्को – मासेमारी बंदीच्या काळात मासेमारी होत असल्याने
मत्स्योद्योग खात्याने (Fisheries Department) पारंपरिक मच्छीमारांना (fishermen) कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या मच्छीमार संघटनांनी राज्य सरकारला १५ दिवसांची मुदत देत मागण्या पूर्ण न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

राज्यातील ‘गोंयच्या रापोणकारांचे एकवोट’ या मुख्य संघटनेच्या नेतृत्वाखाली पारंपरिक मच्छीमारांच्या १९ संघटनांनी वास्को (Vasco) येथे रजा पत्रकार परिषदेत हा इशारा दिला.यावेळी सैंघटनेचे अध्यक्ष आग्नेलो रॉड्रिग्ज (Agnello Rodriguez), सरचिटणीस ओलंसियो सिमोईस (Olancio Simois) तसेच कस्टोडिओ डिसोझा यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी मत्स्योद्योग खात्याच्या संचालिका डॉ.शर्मिला मोन्तेरो या बोटमालकांच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप करण्यात आला.तसेच त्यांचा तत्काळ राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.संघटनेचे अध्यक्ष रॉड्रिग्ज यांनी सांगितले की,आम्ही एलईडी लाईट मासेमारी प्रतिबंधक कायद्याचा निषेध करतो.कारण मोन्तेरो यांनी १५० केव्ही जनरेटर वापराबाबत उच्च न्यायालयात शपथपत्र दिले आहे.


आम्ही मासेमारीसाठी ९.९ एचपी क्षमतेच्या दोन मोटरी नेतो.मात्र वापर फक्त एकाचाच करतो.पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो,त्यामुळे दुसरी मोटर ही फक्त आपत्कालीन स्थितीत वापरण्याची सोय असते. यामध्ये बंदीचे उल्लंघन करण्याचा आमचा उद्देश नाही.वास्तविक सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मासेमारी बंदी काळात किनारपट्टीवर मासेमारीला बंदी नाही.

यावेळी कस्टोडिओ डिसोझा यांनी सांगितले की,बोटींच्या आकार, इंजिन शक्ती व जाळ्यांच्या वापरासंदर्भात बोटमालक कायद्याचे उल्लंघन करत आहे. संचालिकांनी या बोटी जप्त कराव्यात.तसेच पारंपरिक होड्यांचा विमा काढण्यासाठी लागणारे बिल नाही. कारण २० वर्षांपूर्वी बांधलेल्या होड्यांचे बिल मिळणे अशक्य आहे.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या