मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: साध्वी प्रज्ञा ठाकूर, कर्नल पुरोहित यांच्यासह सर्व 7 आरोपी निर्दोष; न्यायालयाचा निकाल

Malegaon Blast Case

Malegaon Blast Case: महाराष्ट्रातील मालेगाव येथील 2008 च्या बॉम्बस्फोट (Malegaon Blast Case) प्रकरणात एनएआयएच्या विशेष न्यायालयाने माजी भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. बॉम्बस्फोट होऊन सतरा वर्षांनंतर (Malegaon Blast Case) हा निकाल देण्यात आला आहे.

विशेष न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी सांगितले की, केवळ संशयावर खटला पुढे जाऊ शकत नाही. त्यांनी स्पष्ट केले की, सरकारी पक्षाला आरोपींविरुद्ध पुरेसे पुरावे सादर करता आले नाहीत.

न्यायालयाचा निर्णय

इंडिया टूडेच्या रिपोर्टनुसार न्यायाधीश म्हणाले की, “समाजाविरुद्ध गंभीर घटना घडली आहे, परंतु न्यायालय नैतिकतेच्या आधारावर कोणालाही दोषी ठरवू शकत नाही.” याप्रकरणात न्यायालयाने प्रज्ञा ठाकूर, प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, सुधाकर चतुर्वेदी, अजय राहिरकर, सुधाकर धर द्विवेदी उर्फ शंकराचार्य आणि समीर कुलकर्णी यांचीही निर्दोष केली आहे.

2008 साली झाला होता स्फोट

29 सप्टेंबर 2008 रोजी रमजानच्या महिन्यात मालेगावात मोटरसायकलला बांधलेल्या स्फोटकामुळे मोठा स्फोट झाला होता. या घटनेत सहा लोकांचा मृत्यू झाला आणि शंभरहून अधिक जखमी झाले. तपास सुरुवातीला महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने केला होता, नंतर 2011 मध्ये राष्ट्रीय तपास संस्थेकडे हस्तांतरित झाला. एटीएसने दावा केला होता की, अभिनव भारत या गटाने हा कट रचला होता.

न्यायालयाने सांगितले की, पुरोहित यांनी आरडीएक्स आणले किंवा बॉम्ब तयार केला याचा पुरावा नाही. तसेच, प्रज्ञा ठाकूर त्या मोटरसायकलच्या मालक होत्या याचा ठोस पुरावा नाही. अभिनव भारतावरही दहशतवादी गतिविधींचा आरोप सिद्ध झाला नाही.