Yamaha MT 15 बाईक भारतात लाँच; लिक्विड-कूल्ड इंजिन, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह काय आहे खास?

Yamaha MT 15 Bike Details

Yamaha MT 15 Bike Details: यामाहाने भारतीय बाजारात त्यांच्या लोकप्रिय MT बाईकचे नवीन मॉडेल Yamaha MT 15 लाँच केले आहे. ही नवीन बाईक (Yamaha MT 15 Bike Details) आकर्षक रंग, टीएफटी डिस्प्ले (TFT Display), स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि 155 सीसी लिक्विड-कूल्ड इंजिनसह उपलब्ध आहे. तरुणाईला आकर्षित करण्यासाठी कंपनीने या बाईकची किंमतही परवडणारी ठेवली आहे.

ही बाईक स्टँडर्ड आणि डीएलएक्स या दोन व्हेरियंटमध्ये बाजारात आणली आहे. Yamaha MT 15 ची किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घेऊयात.

Yamaha MT 15 ची वैशिष्ट्ये

नवीन यामाहा एमटी 15 मध्ये अनेक शानदार वैशिष्ट्ये (Features) देण्यात आली आहेत.

  • टीएफटी डिस्प्ले: बाईकच्या डीएलएक्स व्हेरिएंटमध्ये टीएफटी डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामुळे बाईकची माहिती स्पष्टपणे दिसते.
  • यामाहा वाय-कनेक्ट ॲप: यामाहा वाय-कनेक्ट ॲपच्या मदतीने स्मार्टफोनला बाईकशी सहजपणे जोडता येते. यामुळे तुम्हाला पार्किंगची जागा, नोटिफिकेशन अलर्ट, देखभालीसाठी सूचना आणि पेट्रोलची माहिती मिळते.
  • इंजिन: या बाईकमध्ये 155 सीसीचे लिक्विड-कूल्ड सिंगल सिलेंडर इंजिन आहे, जे 18.4 बीएचपीची पॉवरआणि 14.1 एनएमचा टॉर्क निर्माण करते.
  • गिअरबॉक्स आणि ब्रेक्स: स्मूथ क्लचसाठी यात 6-स्पीड गिअरबॉक्स आहे. सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी यात 17 इंचाचे अलॉय व्हील्स आणि दोन्ही टायरमध्ये डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत.

यामाहा एमटी बाईक तरुणांना आकर्षित करण्यासाठी तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. डीएलएक्स व्हेरिएंटसाठी आइस स्टॉर्म आणि व्हिविड व्हायलेट मेटॅलिक हे पर्याय दिले आहेत. स्टँडर्ड व्हेरिएंटसाठी मेटॅलिक सिल्व्हर सायन रंगाचा पर्याय उपलब्ध आहे.

Yamaha MT 15 ची किंमत

आकर्षक रंग आणि बोल्ड लूकसह कंपनीने या बाईकची किंमतही किफायतशीर ठेवली आहे. यामाहा एमटी 15 डीएलएक्स व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 1,80,500 रुपये आहे. स्टँडर्ड व्हेरिएंटची किंमत 1,69,500 रुपये आहे.