New Movie Releases in August: ऑगस्ट 2025 हा चित्रपटप्रेमींसाठी खास ठरणार आहे. या महिन्यात (New Movie Releases in August) अनेक सार्वजनिक सुट्ट्या तर आहेतच, सोबतच थरारक अॅक्शन, रोमँटिक ड्रामा, ऐतिहासिक चरित्रपट आणि हॉरर चित्रपटांचा समावेश असलेले विविध मनोरंजनपर चित्रपट रिलीज होणार आहेत.
1 ऑगस्टपासूनच दोन मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तुम्ही देखील चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल तर त्याआधी रिलीज होणाऱ्या चित्रपटांची यादी पाहा.
ऑगस्ट महिन्यात रिलीज होणार हे चित्रपट
धडक 2 (1 ऑगस्ट): त्रिपती डिमरी आणि सिद्धांत चतुर्वेदी यांची जोडी या रोमँटिक ड्रामात झळकणार आहे. हा 2018 च्या ‘धडक’चा सिक्वेल असून, तमिळ चित्रपट ‘परियेरुम पेरुमल’चा रिमेक आहे. जात आणि वर्गभेदावर आधारित हा चित्रपट सामाजिक संदेशही देतो. दिग्दर्शक शशांक खेतान यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 1 ऑगस्टला हा चित्रपट रिलीज झाला आहे.
सन ऑफ सरदार 2 (1 ऑगस्ट): 2012 च्या ‘सन ऑफ सरदार’चा दुसरा भाग असलेला हा चित्रपट विजय कुमार अरोरा यांनी दिग्दर्शित केला आहे. अजय देवगण आणि मृणाल ठाकूर यांच्या विनोदी आणि अॅक्शनच्या मिश्रणाने हा चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवेल.
अजय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी (1 ऑगस्ट): उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावर आधारित हा चरित्रपट शांतनू गुप्ता यांच्या पुस्तकावर बनवला आहे. अनंत जोशी यांनी त्यांची भूमिका साकारली असून, त्यांच्या आध्यात्मिक आणि राजकीय प्रवासाची गोष्ट उलगडणार आहे.
वॉर 2 (14 ऑगस्ट): ‘वॉर’ फ्रँचायझीचा पुढील भाग असलेला हा चित्रपट स्वातंत्र्यदिनाच्या आठवड्यात रिलीज होईल. हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर यांची पहिलीच जोडी प्रेक्षकांसाठी उत्सुकता वाढवणारी आहे. दिग्दर्शक ए.आर. मुरुगदॉस यांनी या चित्रपटालाचे दिग्दर्शन दिले आहे.
कुली (14 ऑगस्ट): रजनीकांत यांचा हा अॅक्शनपट सोन्याच्या तस्करीच्या कथेवर आधारित आहे. यात आमिर खानची खास भूमिका आहे. ‘वॉर 2’ सोबतच या चित्रपटाची टक्कर प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरेल.
परम सुंदरी (29 ऑगस्ट): जान्हवी कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचा रोमँटिक कॉमेडी चित्रपट उत्तर आणि दक्षिण भारतीय संस्कृतीतील प्रेमकथेवर आधारित आहे. दिग्दर्शक करण जोहर यांनी या चित्रपटाला हलक्या-फुलक्या शैलीत सादर केले आहे.