Free Colors for Idol Makers from Mumbai Municipal Corporation
मुंबई – यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून मूर्तिकारांना (Mumbai BMC free colors)मोफत शाडूची माती आणि गणेश कार्यशाळेच्या (BMC support for idol makers)मूर्ती घडविण्यासाठी मोफत जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यानंतर आता मूर्तिकारांना मोफत पर्यावरणपूरक रंगही पालिकेच्या वतीने पुरवण्यात येणार आहेत. प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.(Ganesh idol making 2025)
मुंबई महापालिका मूर्तिकारांना पांढरा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा आणि लाल असे ७ हजार ८०० लिटर पर्यावरणपूरक रंग आणि तीन हजार लिटर इको प्रायमर रंग मोफत देणार आहे. (BMC Ganesh Chaturthi initiative)या रंगांचा वापर करून मूर्तिकारांनी गणेशमूर्ती रंगवाव्या असे (Mumbai artisans support)आवाहन पालिकेने केले. यामध्ये इतर रंगांच्या तुलनेत पांढरा रंग मोठ्या प्रमाणात पुरविण्यात येणार आहे. पर्यावरणपूरक पांढरा प्रायमरही देण्यात येणार आहे. जलप्रदूषण कमी करणे हा त्यामागील उद्देश आहे. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार प्रशासनाकडून निरनिराळ्या नागरी सेवासुविधा पुरवल्या जात आहेत. मुंबई शहरात शाडू मातीच्या मूर्ती घडविण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, जास्त पर्यावरणपूरक मूर्तींची प्रतिष्ठापना व्हावी यासाठी पालिकेकडून मूर्तिकारांना याआधी मोफत शाडू माती दिली आहे.