Agriculture minister Bharne वाकडे काम करून ते सरळ करणाऱ्यांची नोंद घेतली जाते

Those who straighten crooked dealings are always noted, says new Agriculture Minister

Those who straighten crooked dealings are always noted, says new Agriculture Minister

मुंबई – वाकडे काम करून जे ते परत नियमात बसवतात, त्यांचीच नोंद घेतली जाते असे वादग्रस्त विधान राज्याचे नवे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे (agriculture minister Bharne controversial statement )यांनी केले. इंदापूरमधील महसूल विभागाच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. पदभार स्वीकारल्यानंतर २४ तासातच ते असे म्हणाल्याने मंत्री माणिकराव कोकाटे(Manikrao kokate )यांच्यानंतर कृषीमंत्र्यांची वादग्रस्त वक्तव्यांची परंपरा कायम ठेवली आहे, (Maharashtra ministers controversy)अशी प्रतिक्रिया उमटत आहे.(Bharne crooked work remark)
कृषिमंत्री दत्ता भरणे म्हणाले की, जगात सगळ्यांसमोर अडचणी आणि मोठी संकटे आहेत. मात्र या काळात आपण लोकांना सहकार्य केले पाहिजे. तरच फायदा होतो. आज मी तुमच्यासमोर उभा आहे. कारखान्यावर संचालक झालो. चांगले काम करू. पण चांगले काम सगळेच करतात. सगळेच जण सरळ काम करतात. पण एखादे वाकडे काम करून परत सरळ नियमात बसवतात त्याच माणसांची नोंद घेतली जाते.
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, नवीन कृषिमंत्री दत्ता भरणे यांचे हे पहिलेच वक्तव्य एवढे घातक आहे. तुम्ही काय म्हणालात की, वाकडी कामेसुद्धा आपल्याला करावी लागतात. अनेक नेत्यांनी वेडीवाडकी कामे करून राज्याची तिजोरी वेडीवाकडी भरली आहे. अशा नेत्यांची मालमत्ता, संपत्ती पाहिली की, ती ताडासारखी सरळ वाढताना दिसते. भरणे मामांना सांगतो की, महाराष्ट्र प्रत्येक मंत्र्याकडे पाहत आहे. तुमच्याकडून वाकडे काम झाले तर हा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. आम्हीही तुम्हाला सोडणार नाही.