Nothing Phone 3 वर 23 हजारांची जबरदस्त सूट, फीचर्स भन्नाट; ऑफर एकदा पाहाच

Nothing Phone 3 Smartphone Offer

Nothing Phone 3 Smartphone Offer: ‘नथिंग’चा (Nothing) नवीन फ्लॅगशिप फो Nothing Phone 3 सध्या चर्चेत आहे. ॲमेझॉनच्याग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल’ सेलमध्ये (Amazon Great Freedom Festival Sale) या फोनची किंमत मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे हा फोन आता 60,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे. या फोनची लाँच किंमत 79,999 रुपये होती.

Nothing Phone 3 मध्ये नवीन ‘ग्लिफ इंटरफेस’, ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि स्नॅपड्रॅगन 8s जेन 4 प्रोसेसर आहे. या फोनची किंमत आणि फीचर्स जाणून घेऊयात.

Nothing Phone 3 वर ॲमेझॉनची ऑफर (Nothing Phone 3 Smartphone Offer)

  • Nothing Phone 3 सध्या ॲमेझॉनवर 56,324 रुपयांना उपलब्ध आहे. ही किंमत त्याच्या लाँच किंमतीपेक्षा 23,675 रुपयांनी कमी आहे.
  • जर तुम्ही एसबीआय क्रेडिट कार्ड (SBI Credit Card) वापरले तर तुम्हाला 1,000 रुपयांची अतिरिक्त बँक सवलत मिळू शकते.
  • याशिवाय, तुमचा जुना फोन एक्सचेंज करून तुम्ही 47,150 रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट मिळवू शकता. ही सूट तुमच्या जुन्या फोनच्या मॉडेल आणि स्थितीवर अवलंबून असेल.
  • ॲमेझॉन या फोनवर मासिक हप्त्यांचा पर्याय देखील देत आहे, जे दरमहा 2,718 रुपयांपासून सुरू होतात. ‘नो-कॉस्ट ईएमआय’चा पर्यायही उपलब्ध आहे.

Nothing Phone 3 चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले: यात 6.67 इंचाचा अॅमोलेड पॅनल आहे, जो एचडीआर10+ (HDR10+) ला सपोर्ट करतो आणि त्याला ‘कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7आय’चे संरक्षण आहे.
  • प्रोसेसर आणि मेमरी: फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8s जेन 4 चिपसेट आहे, जो 16 जीबीपर्यंत रॅम (RAM) आणि 512 जीबीपर्यंत स्टोरेजसह जोडलेला आहे.
  • कॅमेरा: फोटोग्राफीसाठी यात 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 50 मेगापिक्सलचा पेरिस्कोप कॅमेरा (3x ऑप्टिकल झूम) आणि 50 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आहे. सेल्फीसाठीही यात 50 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
  • बॅटरी: यात 5,500mAh ची बॅटरी आहे, जी 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.