Sanjay Raut letter: माजी उपराष्ट्रपती धनखड आहेत कुठे ? संजय राऊतांचे अमित शहांना पत्र

Where Is Former Vice President Dhankhar? Sanjay Raut

मुंबई – आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा देणारे उप राष्ट्रपती जगदीप धनखड(Vice President Dhankhar)यांच्याशी कोणालाही संपर्क साधता येत नसल्याने शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत (UBT Sanjay Raut) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून त्यांच्या ठावठिकाणा कुठे आहे,अशी विचारणा केली आहे. शहा यांनी माहिती न दिल्यास न्यायालयात हेबियस कॉर्पस याचिका दाखल करण्यात येईल, असा इशाराही राऊत यांनी दिला आहे.

उप राष्ट्रपती हे पद घटनात्मक(constitutional) महत्वाचे आहे. अशा पदावरून एखादी व्यक्ती प्रकृतीचे कारण देत तडकाफडकी राजीनामा देते आणि त्यानंतर ती व्यक्ती कुठे आहे, याचा ठावठिकाणा सर्वसामान्यांना लागू नये ही गंभीर बाब आहे. नवीन उपराष्ट्रपती निवडला जात नाही तोवर धनखड यांनी कामकाज पाहायचे आहे . मात्र ते सापडत नाहीत. या देशाचा नागरिक (citizen)आणि संसद सदस्य या नात्याने माजी उप राष्ट्रपती धनखड कुठे आहेत हे जाणून घेण्याचा मला अधिकार आहे. आम्ही त्यांच्या घरापर्यंत जाऊन आलो. पण आम्हाला पुढे जाऊ दिले नाही, धनखड यांना त्यांच्या घरात नजरकैदेत (house arrest)ठेवले आहे का, याचे उत्तर मिळाले पाहिजे. आपण माहिती दिली नाही तर नाईलाजास्तव आम्हाला न्यायालयात हेबियस कॉर्पस याचिका (habeas corpus petition)दाखल करावी लागेल,असे संजय राऊत यांनी पत्रात (letter) म्हटले आहे.

आजच्या इंडिया आघाडीच्या निवडणूक आयोगाच्या (Election Commission)विरोधातील मोर्चाबद्दल बोलताना राऊत यांनी आयोगावर सडकून टीका केली. निवडणूक आयोग हे दुतोंडी गांडूळ आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)यांनी पुरावे दाखवून देखील आयोग त्यांच्याकडे पुरावे मागत आहे. महाराष्ट्रात (Maharashtra)अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar’)यांची जागा कशी चोरली याचे पुरावे आम्ही आयोगाला दिले आहेत. त्याचे आयोगाने काय केले हे राज्याच्या जनतेने पाहिले आहे,असे राऊत म्हणाले.