August 2025 Bank Holidays list : या आठवड्यात (11 ते 17 ऑगस्ट 2025) देशभरातील बँकांना अनेक सुट्ट्या असणार आहेत. यामध्ये राष्ट्रीय कार्यक्रम, प्रादेशिक सण आणि नियमित वीकेंडचा समावेश आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) अधिकृत वेळापत्रकानुसार, या आठवड्यात स्वातंत्र्य दिन (Independence Day), जन्माष्टमी (Janmashtami), कृष्ण जयंती (Krishna Jayanthi) अशा सुट्ट्या आहेत, तसेच दुसरा शनिवार आणि रविवारची साप्ताहिक सुट्टीही असणार आहे.
सुट्ट्यांचे वेळापत्रक:
- 13 ऑगस्ट: इम्फाळ, मणिपूर येथे ‘देशभक्त दिवस’ निमित्त बँका बंद राहतील.
- 15 ऑगस्ट: स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरातील सर्व बँका बंद राहतील. या दिवशी काही राज्यांमध्ये ‘पारशी नववर्ष’ (Parsi New Year) आणि जन्माष्टमी निमित्त अतिरिक्त सुट्ट्या असतील.
- 16 ऑगस्ट: गुजरात, तामिळनाडू, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार आणि इतर काही राज्यांमध्ये जन्माष्टमी (श्रावण वद-8) आणि कृष्ण जयंती निमित्त बँका बंद राहतील.
- 17 ऑगस्ट: रविवार असल्यामुळे देशभरातील बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.
रिझर्व्ह बँकेच्या नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट अंतर्गत या सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या असल्या, तरी राज्यानुसार या सुट्ट्यांमध्ये फरक असू शकतो. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या स्थानिक बँकेच्या शाखेतून वेळापत्रक तपासणे योग्य ठरेल.
बँका बंद असल्या तरीही आवश्यक बँकिंग सेवा सुरूच राहणार आहेत. ऑनलाइन बँकिंग, मोबाईल बँकिंग, यूपीआय पेमेंट्सआणि एटीएमयांसारख्या सेवा नेहमीप्रमाणे चालू असतील.