नवी दिल्ली – आदेशाचे उल्लंघन करत कबुतरांना सार्वजनिक ठिकाणी दाणे घालणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल (File Cases)करा,असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court)काल दिले.न्या. जे के माहेश्वरी (Justice J. K. Maheshwari)आणि न्या. विजय बिश्नोई (Justice Vijay Bishnoi)यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला.
मुंबई उच्च न्यायालयाचे (Mumbai High Court’)आदेश डावलून दादरच्या कबुतरखान्याच्या ठिकाणी (Dadar pigeon feeding spot)आंदोलन करून पालिकेने घातलेले ताडपत्रीचे आच्छादन जमावाने फाडून कबुतरांना दाणे टाकल्याबद्दल न्यायालयाने तीव्र संताप व्यक्त केला.अशा प्रकारे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांबाबत कोणतीही सहानुभुती दाखवण्याची गरज नाही. त्यांच्याविरूध्द गुन्हे दाखल करावेत,असे न्यायालयाने ठणकावून सांगितले.
मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका काही पक्षीप्रेमींनी केली होती. या याचिकेवर सुनावणीप्रसंगी न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला. उच्च न्यायालयाच्या आदेशात सुधारणा करण्याची मागणी उच्च न्यायालयातच करा,असे निर्देश न्यायालयाने दिले.
सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर (Supreme Court’s order)आता मुंबई महानगरपालिकाही (BMC) आक्रमक झाली आहे. पालिकेने दादरच्या कबुतरखान्यावर पुन्हा ताडपत्री टाकली असून यावेळी ताडपत्री फाडणाऱ्यांच्या विरोधात पालिका थेट पोलिसांत तक्रार दाखल करणार आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना दाणे देणाऱ्यांवरही पालिकेच्या वतीने कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेच्या घनकचरा विभागाच्या वतीने ठिकठिकाणी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.