अमृतसर- खलिस्तानी (Khalistani) समर्थक संघटना शीख फॉर जस्टिस (Sikhs for Justice) चा दहशतवादी (Terrorist) गुरपतवंत सिंग पन्नू (Gurpatwant Singh Pannu) हा त्याचा साथीदार जश्नप्रीत सिंगच्या कथित एन्काउंटरमुळे संतापला आहे. त्याने १५ ऑगस्ट रोजी दिल्ली(Delhi)ला जाणाऱ्या गाड्यांवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. त्याने लोकांना त्या दिवशी रेल्वेने प्रवास करू नये, असा इशारा दिला.
पन्नूने व्हिडिओत (Video) पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान(Punjab CM Bhagwant Mann) यांच्यावर थेट आरोप करत, खलिस्तानी समर्थकांवर मान सरकारने पहिली गोळी चालवल्याचा दावा केला. त्याने आपला साथीदार जश्नप्रीत सिंग(Jashanpreet Singh) च्या कथित एन्काउंटरला (Encounter) बनावट आणि राज्य-पुरस्कृत दहशतवाद म्हटले व बदला घेण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री मान यांच्या परदेश दौऱ्याची माहिती देणाऱ्यास बक्षीस देण्याची घोषणाही त्याने केली. पन्नूने लोकांना पंजाबमधील फरीदकोट येथे होणाऱ्या तिरंगा कार्यक्रमापासून दूर राहण्याचेही आवाहन केले असून हा सूड देशभर व परदेशात घेतला जाईल, असा इशाराही दिला आहे. या धमकीमुळे सुरक्षा यंत्रणा सज्ज झाली असून, प्रवाशांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
जश्नप्रीत सिंगने त्याच्या साथीदारांसह अमृतसर, शिवला मंदिर बाग भैया, कछेरी परिसर आणि खालसा कॉलेजमध्ये तीन ठिकाणी खलिस्तान समर्थक घोषणा दिल्या होत्या. अमृतसरमध्ये खलिस्तान समर्थक भित्तिचित्रे रंगवल्याचा आरोप असलेल्या जशनप्रीत सिंगला शस्त्रास्त्र जप्तीसाठी नेले जात असताना पोलिसांशी झालेल्या चकमकीत तो जखमी झाला.