मुंबई – आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक (former ICICI Bank Managing Director)आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर (Chanda Kochhar,)यांचे पती व्यावसायिक दीपक कोचर यांना न्यूपॉवर रिन्युएबल्स प्रायव्हेट लिमिटेड (NuPower Renewables Pvt. Ltd)कंपनीतील गैरव्यवहारप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court)काही प्रमाणात दिलासा दिला. त्यांची प्रकृती व वयाचा विचार करून त्यांच्या चौकशीचे वेळापत्रक निश्चित करावे,असे निर्देश उच्च न्यायालयाने गंभीर गुन्हे तपास कार्यालयाला (SFIO) दिले आहेत.
न्यूपॉवर रिन्यूएबल्स ही कंपनी दीपक कोचर (Deepak Kochhar)आणि अन्य काही कंपन्या मिळून चालवत होते. या कंपनीत मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप आहे. एसएफआयओ या प्रकरणी चौकशी करत आहे.उद्या १३ ऑगस्ट रोजी एसएफआयओने कोचर यांना चौकशीसाठी चेन्नईला (Chennai)बोलावले होते . मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपल्या चौकशीचा कालावधी मर्यादित असावा,अशी विनंती कोचर यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली होती.या याचिकेवर न्या. रविंद्र घुगे आणि न्या .गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्याप्रसंगी न्यायालयाने एसएफआयओला सायंकाळी ५ पर्यंतच चौकशी करण्याचे बंधन घातले आहे. हे निर्देश देत कोचर यांना दिलासा दिला.