Home / लेख / जिओचा सर्वात स्वस्त प्लॅन! फक्त ‘इतक्या’ रुपयात मिळेल 336 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि 3600 SMS

जिओचा सर्वात स्वस्त प्लॅन! फक्त ‘इतक्या’ रुपयात मिळेल 336 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि 3600 SMS

Best Jio Recharge Plan

Best Jio Recharge Plans: टेलिकॉम कंपनी जिओ (Jio) आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी अनेक प्रीपेड प्लॅन (Best Jio Recharge Plans) ऑफर करते, ज्यात ग्राहकांच्या गरजेनुसार वेगवेगळे फायदे दिले जातात. कंपनीकडे अगदी 200 रुपयांपासून ते 3 हजार रुपयांपर्यंत येणारे रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध आहे. कंपनी महिन्याभराच्या मुदतीसाठी येणारे प्लॅन्स देखील ऑफर करते.

कंपनी काही प्लॅन जास्त डेटा वापरणाऱ्यांसाठी घेऊन येते, तर काही प्लॅनमध्ये केवळ कॉलिंग (Calling) आणि एसएमएस (SMS) सुविधा दिली जाते. आज आम्ही तुम्हाला जिओच्या अशाच एका स्वस्त प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यात कंपनी डेटा देत नाही, पण 336 दिवसांच्या मुदतीसाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि 3600 एसएमएसची सुविधा देते. च

जिओचा 1748 रुपयांचा प्लॅन

जिओच्या या प्लॅनची किंमत 1,748 रुपये आहे. यात कंपनी 336 दिवसांची मोठी वैधता देत आहे. यासोबतच, या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही मिळते. म्हणजेच, तुम्ही या प्लॅनसह हव्या तितक्या वेळ कॉलिंगचा आनंद घेऊ शकता. तसेच, या प्लॅनमध्ये तुम्हाला 3600 एसएमएस पाठवण्याची सुविधाही मिळते.

या प्लॅनमध्ये तुम्हाला डेटाची कोणतीही सुविधा मिळत नाही. हा प्लॅन खास अशा लोकांसाठी डिझाइन केला आहे, ज्यांना फक्त कॉलिंगची आवश्यकता आहे. सध्या अनेक घरांमध्ये वायफाय असल्याने महागडा डेटा प्लॅन घेण्याचा अर्थ राहत नाही. त्यामुळे तुम्हाला अशा स्वस्त आणि लाँग-टर्म प्लॅनचापर्याय निवडता येईल.

जिओचा 448 रुपयांचा प्लॅन

जिओकडे 448 रुपयांचा स्वस्त प्लॅन उपलब्ध आहे. ज्याची वैधता 84 दिवस आहे. या प्लॅनमध्ये मिळणारे फायदे 1748 रुपयांच्या प्लॅनसारखेच आहेत. म्हणजेच, या प्लॅनमध्येही अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली आहे. यासोबतच, कंपनी या प्लॅनमध्ये तुम्हाला 1000 एसएमएस पाठवण्याची सुविधा देत आहे.