Home / क्रीडा / सुरेश रैनाला ईडीने बजावली नोटीस, ‘या’ प्रकरणात होणार चौकशी

सुरेश रैनाला ईडीने बजावली नोटीस, ‘या’ प्रकरणात होणार चौकशी

ED Summons Suresh Raina

ED Summons Suresh Raina : माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाला (Suresh Raina) अंमलबजावणी संचालनालय (ED) ने 1xBet ऑनलाइन बेटिंग प्रकरणाच्या संदर्भात चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. आज (13 ऑगस्ट) तपास यंत्रणेसमोर हजर राहून त्यांचे जबाब नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत.

बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग ॲप्स (Illegal Betting Apps) आणि प्लॅटफॉर्मवर सुरू असलेल्या कारवाईचा हा एक भाग आहे, ज्यांचा अनेक सेलिब्रिटींनी प्रचार केला होता.

याच प्रकरणात, अभिनेता राणा दग्गुबाती (Rana Daggubati) हैदराबाद येथील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाला होता. त्याला यापूर्वी 23 जुलै रोजी समन्स बजावण्यात आले होते

यापूर्वी मे महिन्यात, तेलंगणा पोलिसांनी राणा दग्गुबाती आणि प्रकाश राज (Prakash Raj) यांसह 25 लोकप्रिय कलाकारांवर गुन्हे दाखल केले होते. या दोन्ही कलाकारांनी आपण आता अशा प्लॅटफॉर्मचा प्रचार करत नसल्याचे सांगितले होते.

या एफआयआरमध्ये अभिनेता मंचू लक्ष्मी, निधी अग्रवाल, अनन्या नागल्ला आणि टीव्ही अँकर श्रीमूखी यांच्या नावांचाही समावेश आहे. ईडी त्यांच्या आर्थिक व्यवहारांची आणि डिजिटल पुराव्यांची चौकशी करत आहे.

दरम्यान, 2023 ते 2024 या काळात गाजलेल्या महादेव ऑनलाइन बेटिंग प्रकरणात छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यांनी हे आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे सांगतआपला या घोटाळ्याशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते.