Home / देश-विदेश / ‘पाण्याचा एक थेंबही…’, सिंधू करारावरून पाक पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी

‘पाण्याचा एक थेंबही…’, सिंधू करारावरून पाक पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी

Shehbaz Sharif on Indus Waters Treaty

Shehbaz Sharif on Indus Waters Treaty: सिंधू पाणी वाटप करारावरून (Indus Waters Treaty) पाकिस्तानने (Pakistan) पुन्हा एकदा भारताला (India) इशारा दिला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी ‘शत्रूला’ त्यांच्या देशाच्या ‘पाण्याचा एक थेंबही’ हिसकावून घेऊ देणार नाही, असे म्हटले आहे.

नुकतेच, पाकिस्तानचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांनी अमेरिकेतून भारताला अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी दिली होती. त्यानंतर आता शरीफ यांनी सिंधू जल करारावरून भारताला पोकळ धमकी दिली आहे.

पहलगामयेथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 1960 च्या सिंधू पाणी कराराला स्थगित केले होते. तेव्हापासून पाकिस्तान सतत यावर आक्रमक प्रतिक्रिया देत आहे.

शाहबाज शरीफ यांनी इस्लामाबाद येथील एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, “मला आज शत्रूला सांगायचे आहे की, जर तुम्ही आमच्या पाण्याचा प्रवाह थांबवण्याची धमकी दिली, तर हे लक्षात ठेवा की तुम्ही पाकिस्तानच्या पाण्याचा एक थेंबही हिसकावून घेऊ शकणार नाही.”

जर भारताने असे कृत्य करण्याचा प्रयत्न केला, तर ‘तुम्हाला पुन्हा एकदा असा धडा शिकवला जाईल की तुम्ही कान धरून बसाल,’ असा इशाराही शरीफ यांनी दिला. शरीफ यांच्याआधी पाकचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनीही अशाच प्रकारचे वक्तव्य केले होते.

यापूर्वी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर ( यांनीही अमेरिकेत बोलताना भारताला धमकी दिली होती. ते म्हणाले होते, “जर भारताने पाकिस्तानचा पाणीपुरवठा थांबवण्यासाठी धरण बांधले, तर आम्ही ते नष्ट करू.सिंधू नदी ही भारतीयांची कौटुंबिक मालमत्ता नाही,’ असेही ते म्हणाले होते.

भारताचे सडेतोड उत्तर

या धमक्यांना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सडेतोड उत्तर दिले आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, ‘अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देणे ही पाकिस्तानची जुनी सवय आहे आणि भारत अशा कोणत्याही धमक्यांना बळी पडणार नाही. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेचे (रक्षण करण्यासाठी आवश्यक ती सर्व पाऊले उचलली जातील.’ याव्यतिरिक्त, मित्र देशाच्या भूमीवरून अशा धमक्या देणे खेदजनक आहे, असेही परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेला उद्देशून सांगितले.