Home / News / पंढरपूर कॉरिडॉरवरून वाद !वारकऱ्यांचा भूसंपादनाला विरोध

पंढरपूर कॉरिडॉरवरून वाद !वारकऱ्यांचा भूसंपादनाला विरोध

Controversy over Pandharpur Corridor! Warkaris oppose land acquisition

Controversy over Pandharpur Corridor! Warkaris oppose land acquisition

पंढरपूर – बहुचर्चित पंढरपूर कॉरिडॉर(Pandharpur Corridor) प्रकल्पावरून वारकरी संप्रदाय आणि प्रशासन यांच्यातील(Warkari protest) वाद चिघळला आहे. नुकत्याच झालेल्या वारकरी आणि जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत वारकऱ्यांनी पंढरपूरच्या विकासाला पाठिंबा दिला, मात्र कॉरिडॉरसाठी होणाऱ्या भूसंपादनाला तीव्र विरोध दर्शवला.(Land acquisition issue) तर जिल्हाधिकाऱ्यांनी कॉरिडॉर कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होणारच अशी ठाम भूमिका घेतली आहे.(Pandharpur land row)
कॉरिडॉर तयार करताना धार्मिक आणि सांस्कृतिक भावना जपल्या जाव्यात. विकासकामांमध्ये वारकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी वारकरी संप्रदायाने एक अभ्यास समिती तयार करावी. यात वारकऱ्यांचा देखील समावेश करावा अशी मागणी वारकऱ्यांची आहे. ही मागणी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहेत.(Devotional path protest)
या बैठकीत प्रशासनाने कॉरिडॉरमधून होळकर वाडा आणि शिंदे सरकार वाडा वगळण्याची वारकऱ्यांची मागणी मान्य केली आहे. या दोन्ही वाड्यांना २०० वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. त्यामुळे या ऐतिहासिक आणि हेरिटेज वास्तूंचे जतन आणि संवर्धन केले जाणार आहे.
बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले की, आता कॉरिडॉर होणार की नाही यावर चर्चा नको, तो होणारच आहे. कॉरिडॉरमधील मंदिरे, समाधी आणि अनेक हेरिटेज मठांचे जतन व संवर्धन शासन करणार आहे. यामुळे वारकऱ्यांच्या काही मागण्या मान्य झाल्या असल्या तरी, भूसंपादनाचा मुद्दात अजूनही तोडगा निघालेला नाही.