Home / क्रीडा / अर्जुन तेंडुलकरचा झाला साखरपुडा, कोण आहे होणारी बायको सानिया चंडोक?

अर्जुन तेंडुलकरचा झाला साखरपुडा, कोण आहे होणारी बायको सानिया चंडोक?

Arjun Tendulkar Engaged with Sania Chandok

Arjun Tendulkar Engaged with Sania Chandok: भारताचा दिग्गज माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकरचा (Arjun Tendulkar) साखरपुडा झाल्याची माहिती समोर आली आहे. रिपोर्टनुसार, एका खाजगी कौटुंबिक कार्यक्रमात अर्जुनचा मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती रवी घई (Ravi Ghai) यांच्या नातीसोबत साखरपुडा केला आहे.

अर्जुनच्या होणाऱ्या पत्नीचे नाव सानिया चंडोक (Saaniya Chandok) असून, ती सध्या ‘मि. पॉज पेट स्पा अँड स्टोअर एलएलपी’ या संस्थेमध्ये संचालक आहे.

कोण आहे सानिया चंडोक?

सानिया ही प्रसिद्ध हॉस्पिटॅलिटी आणि खाद्य उद्योगात मोठे नाव असलेल्या ‘ग्रॅविस ग्रुप’चे अध्यक्ष रवी घई यांची नात आहे. हा ग्रुप ‘क्वालिटी आईस्क्रीम’, ‘ब्रुकलिन क्रिमरी’ आणि मरीन ड्राईव्हवरील ‘इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल’सारख्या प्रसिद्ध ब्रँड्ससाठी ओळखला जातो.

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवी घेतलेली सानिया ‘मि. पॉज पेट स्पा’ची संस्थापकही आहे. 2024 च्या शेवटी तिला ‘वर्ल्डवाईड व्हेटरिनरी सर्व्हिस’कडून ‘व्हेटरिनरी टेक्निशियन’ डिप्लोमा मिळाला आहे.

सानियाची आणि अर्जुनची बहीण सारा तेंडुलकर यांची चांगली मैत्री आहे. अनेकदा त्या एकत्र सेल्फी घेताना आणि आयपीएलचे (IPL) सामने पाहताना दिसल्या आहेत. अर्जुन आणि सानियाचा साखरपुडा अत्यंत खाजगी पद्धतीने फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत पार पडला. तेंडुलकर किंवा घई कुटुंबाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणाकरण्यात आलेली नाही.

क्रिकेटपटू म्हणून अर्जुनची कारकीर्द

25 वर्षीय अर्जुन तेंडुलकर सध्या क्रिकेटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. तो डावखुरा वेगवान गोलंदाज असून, देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोव्याकडून खेळतो. तसेच, आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाकडून खेळतो.