Home / महाराष्ट्र / महादेवी हत्तीणी संदर्भात तूर्त पुनर्विचार याचिका नाही

महादेवी हत्तीणी संदर्भात तूर्त पुनर्विचार याचिका नाही

No review petition yet regarding Mahadevi Hattini

कोल्हापूर – नांदणी येथील महादेवी (Mahadevi) उर्फ माधुरी हत्तीणी प्रकरणात नांदणी मठ आणि राज्य शासन न्यायालयात (Court) तूर्त पुनर्विचार याचिका दाखल करणार नसल्याची माहिती आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) म्हणाले की, याचिका तूर्त दाखल करणार नाही. तिच्यावर वनतारात (Vantara) उपचार सुरू आहेत. या उपचाराबाबत अहवाल समितीला सादर होणार आहे. हा अहवाल आली की मग त्याचा अभ्यास करूनच पुनर्विचार याचिका तयार केली जाईल. राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठाचे वकील सर्व माहिती तपासूनच याचिका दाखल करतील, जेणेकरून न्यायालयाकडून ती फेटाळली जाणार नाही.

शेट्टी पुढे म्हणाले की, नांदणी मठात १८ ऑगस्ट ते २ ऑक्टोबर दरम्यान चातुर्मास धार्मिक कार्यक्रम होत आहेत. उच्चाधिकार समितीने माधुरी हत्तीणीला वनतारामध्ये पाठवण्याच्या आदेशात परिच्छेद ११० मध्ये नमूद केले आहे की, धार्मिक कार्यक्रमासाठी हत्तीणीला मठात आणण्याची परवानगी मठाला असेल. त्याआधारे १८ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या चातुर्मासासाठी हत्तीणीला तात्पुरत्या स्वरूपात कोल्हापूरला आणावे, त्यानंतर ती कायम मठात राहून उपचार घ्यावेत, यासाठी मठाने याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.