नवी दिल्ली – देशाच्या उत्तरेकडील भागत जोरदार पाऊस (Heavy rainfall)सुरु असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे हिमाचल प्रदेशसह अनेक भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. जम्मू काश्मीर (Jammu & Kashmir)व हिमाचल प्रदेशात या पावसाचा सर्वाधिक कहर झाला आहे.
हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh)अतीवृष्टीमुळे ३७६ रस्ते बंद झाले आहेत. ५३४ वीजेचे ट्रान्सफॉर्मर (Around 534 electricity transformers) व १४५ पाणीपुरवठा योजना (145 water supply schemes)बंद पडल्या आहेत. सिमल्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. चंदीगढ मनाली महामार्गावर (Chandigarh–Manali highway) दरड कोसळल्याने पनारसा भागात रस्ता बंद झाला आहे. मंडीतही गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. सोलनच्या जवळ पावसामुळे रस्त्याला भेगा पडल्या आहेत.
श्रीनैना देवी, पालमपूर, पंडोह, मंडी, कोठी, मालरांव, जोगिंद्रनगर, धर्मशाला, करसोग, सराहन, बिलासपूर भागात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. दिल्लीत कालपासून पाऊस सुरु आहे. आजही दिल्लाच्या अनेक भागात पाणी भरले होते. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), हरियाणा (Haryana), पंजाब (Punjab), उत्तराखंडमध्येही मुसळधार पाऊस झाला. हवामान विभागाने या राज्यांमध्ये पुढील दोन दिवसांसाठी मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे. बिहारमध्येही मुसळधार पाऊस झाला. राजस्थानातील २२ जिल्ह्यांमध्ये पाऊस जाला. येथील उदयपूर, राजसमंद, चित्तौडगड व भीलवाडा जिल्ह्यात मुसळधार तर बांसवाडा, बारां, भूंदी, डूंगरपुर, झालावाड, प्रतापगढ व सिरोह जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.