Home / क्रीडा / ‘त्याने कुत्र्याचे मांस खाल्ले आहे म्हणूनच…’; …जेव्हा इरफान पठाणने शाहिद आफ्रिदीची बोलती केली होती बंद, सांगितला भांडणाचा किस्सा

‘त्याने कुत्र्याचे मांस खाल्ले आहे म्हणूनच…’; …जेव्हा इरफान पठाणने शाहिद आफ्रिदीची बोलती केली होती बंद, सांगितला भांडणाचा किस्सा

Irfan Pathan- Shahid Afridi Controversy

Irfan Pathan- Shahid Afridi Controversy: भारतीय क्रिकेटचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी यांच्यातील मैदानावरील आणि मैदानाबाहेरील वाद नेहमीच चर्चेत राहिला आहे. नुकत्याच एका मुलाखतीत इरफान पठाणने 2006 सालच्या पाकिस्तान दौऱ्यातील एका विमान प्रवासाचा किस्सा सांगितला, ज्यामुळे आफ्रिदीला संपूर्ण प्रवासात गप्प राहावे लागले होते.

इरफानने सांगितले की, 2006 मध्ये भारतीय आणि पाकिस्तानी संघ कराचीहून लाहोरला एकाच विमानाने प्रवास करत होते. त्यावेळी शाहिद आफ्रिदी त्याच्याजवळ आला आणि डोक्यावर हात ठेवून म्हणाला, “बाळा कसा आहेस?” इरफानला ही गोष्ट आवडली नाही. यावर प्रत्युत्तर देत इरफाणने “तू माझा बाप कधीपासून झालास?” असे आफ्रिदीला विचारले. त्यानंतर आफ्रिदीने त्याला काही अपशब्द वापरले.

जेव्हा इरफानने आफ्रिदीची बोलती बंद केली

लल्लनटॉपशी बोलताना इरफान पठाणने सांगितले की, , “माझ्या बाजूला पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू अब्दुल रझाकबसला होता. मी त्याला सहज विचारले की, ‘तुमच्याकडे कोणत्या प्रकारचे मांस मिळते?’ त्यावर त्याने वेगवेगळ्या मांसांबद्दल सांगितले. मग मी त्याला विचारले, ‘इथे कुत्र्याचे मांस मिळते का?’

हे ऐकून रझाक आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, ‘अरे इरफान, असं का बोलतोयस?’ तेव्हा मी म्हटले, ‘त्याला (आफ्रिदीला) कुत्र्याचे मांस खाण्याची सवय असेल, म्हणूनच तो इतका वेळ भुंकतोय’.” इरफानच्या या प्रत्युत्तराने आफ्रिदीला काहीही बोलता आले नाही. या घटनेनंतर तो संपूर्ण प्रवासात गप्प राहिला.

दरम्यान, इरफान पठाणने त्याच्या कारकिर्दीत आफ्रिदीला 11 वेळा बाद केले आहे. 2006 मध्ये कराची कसोटीत त्याने घेतलेली हॅट्ट्रिक आणि 2007 च्या टी20 विश्वचषक फायनलमधील त्याच्या कामगिरीमुळे तो पाकिस्तानविरुद्ध नेहमीच प्रभावी ठरला होता.