Free Government Apps: आजच्या धावपळीच्या जगात सरकारी कामांसाठी रांगेत उभे राहणे कोणालाच आवडत नाही. याच समस्येवर तोडगा म्हणून भारत सरकारने अनेक डिजिटल टूल्स आणि ॲप्स (Apps) सुरू केली आहेत, जी नागरिकांची कामे सोपी आणि जलद करतात. या ॲप्सचा वापर पूर्णपणे मोफत आहे आणि ती तुमचा वेळ आणि त्रास दोन्ही वाचवू शकतात.
अशाच काही महत्त्वाच्या ॲप्सविषयी जाणून घेऊयात, जी सरकारी कामांसाठी तुमच्या उपयोगी येऊ शकतात.
तुमच्यासाठी उपयोगी असे 10 सरकारी ॲप्स:
1. उमंग (UMANG): हे एक युनिफाइड मोबाइल ॲप्लिकेशन आहे, जे केंद्र सरकारपासून स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत 1,500 हून अधिक सरकारी सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देते. पीएफ क्लेम करण्यापासून ते वीज बिल भरण्यापर्यंतची अनेक कामे तुम्ही यावर करू शकता.
2. एआयएस फॉर टॅक्सपेयर्स (AIS for Taxpayers): हे आयकर विभागाचे (Income Tax Department) अधिकृत ॲप आहे. यावर तुम्ही तुमचा वार्षिक माहिती विवरण पाहू शकता आणि त्यावर फीडबॅकही देऊ शकता.
3. डिजिलॉकर (DigiLocker): डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत हे ॲप सुरू करण्यात आले आहे. यात तुम्ही तुमचा आधार, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षितपणे डिजिटल स्वरूपात ठेवू शकता. त्यामुळे तुम्हाला फिजिकल कॉपी सोबत बाळगण्याची गरज नाही.
4. डिजीव्हिएत्रा (DigiYatra): हे ॲप सध्या भारतातील काही प्रमुख विमानतळांवर सुरू आहे. यात फेशिअल रिकग्निशन तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही विमानतळावर जलद चेक-इन करू शकता.
5. आरबीआय रिटेल डायरेक्ट (RBI Retail Direct): या ॲपद्वारे तुम्ही थेट सरकारी सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करू शकता. यात कोणत्याही ब्रोकरची (Broker) गरज नाही, ज्यामुळे प्रक्रिया पारदर्शक आणि सुरक्षित होते.
6. स्वयम् (SWAYAM): या ॲपद्वारे तुम्ही आयआयटी (IITs) आणि आयआयएम (IIMs) सारख्या नामांकित संस्थांकडून मोफत ऑनलाइन कोर्सेस (Online courses) करू शकता.
7. 112 इंडिया (112 India): हे एक आपत्कालीन प्रतिसाद ॲप आहे. याद्वारे तुम्ही पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिकेला एकाच क्लिकवर मदतीसाठी कॉल करू शकता.
8. भीम यूपीआय (BHIM UPI): सरकारने सुरू केलेले हे अधिकृत यूपीआय (UPI) ॲप आहे, जे तुम्हाला सोपे, जलद आणि सुरक्षितपणे कॅशलेस व्यवहार करण्याची सुविधा देते.
9. नेक्स्टजेन एमपरिवहन (NextGen mParivahan): या ॲपमध्ये तुम्ही तुमच्या गाडीची आरसी (RC) आणि ड्रायव्हिंग लायसन्स (DL) डिजिटल स्वरूपात ठेवू शकता. तसेच, दंड तपासणे आणि वाहनाची मालकी तपासणे यासाठीही हे ॲप उपयोगी आहे.
10. दीक्षा (DIKSHA): हे शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी ई-लर्निंग (E-learning) ॲप आहे. यात अभ्यासक्रमानुसार दर्जेदार शैक्षणिक साहित्य उपलब्ध आहे.