FASTag Online Fraud: सरकारने काही दिवसांपूर्वीच FASTag चा वार्षिक पास (FASTag Annual pass) सुरू केला आहे. लाखो लोकं या वार्षिक पासचा उपयोग घेत आहेत. मात्र, FASTag च्या वाढत्या वापरामुळे सायबर गुन्हेगार (Cyber criminals) याचा गैरवापर करत आहेत.
सध्या FASTag शी संबंधित फसवणुकीच्या अनेक घटना समोर येत आहेत, ज्यात बनावट एसएमएस, कॉल्स आणि लिंक्स पाठवून लोकांच्या वॉलेटमधून पैसे काढले जात आहेत. अशा प्रकारच्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी तुम्ही खालील 5 उपाय करू शकता.
FASTag फसवणुकीपासून वाचण्याचे 5 उपाय:
फक्त अधिकृत वेबसाइट किंवा ॲपचा वापर करा
फसवणूक करणारे अनेक बनावट ॲप्स आणि वेबसाइट्स तयार करतात. FASTag संबंधित कोणतेही काम, जसे की रिचार्ज किंवा अपडेट, फक्त बँकेच्या किंवा एनएचएआयच्या अधिकृत वेबसाइटवरून किंवा त्यांच्या अधिकृत ॲपवरूनच करा.
बनावट SMS आणि लिंक्सपासून सावध राहा
सायबर हॅकर्स तुम्हाला ‘तुमचा FASTag बंद होणार आहे’ किंवा ‘केवायसी (KYC) अपडेट करा’ असे बनावट मेसेज पाठवतात. लक्षात ठेवा, कोणत्याही बँकेकडून किंवा एनएचएआय (NHAI) कडून अशा प्रकारचे मेसेज पाठवले जात नाहीत. त्यामुळे, असे मेसेज आल्यास त्यांना त्वरित दुर्लक्षित करा.
ओटीपी, पिन किंवा पासवर्ड शेअर करू नका
तुमचा ओटीपी (OTP), पिन (PIN) किंवा पासवर्ड (Password) कोणत्याही परिस्थितीत कोणासोबतही शेअर करू नका. बँक किंवा कंपनी कधीही तुमच्याकडून ही माहिती मागत नाही.
बॅलन्स आणि ट्रान्झॅक्शनवर लक्ष ठेवा
सतत तुमच्या FASTag वॉलेटचा बॅलन्स आणि ट्रान्झॅक्शन हिस्ट्री तपासत राहा. जर तुम्हाला कोणतीही चुकीची ट्रान्झॅक्शन दिसली, तर तात्काळ कस्टमर केअरशी संपर्क साधा आणि तक्रार दाखल करा.
अनोळखी QR कोड स्कॅन करणे टाळा
अनोळखी नंबरवरून किंवा व्हॉट्सॲपवरून येणारे क्यूआर कोड (QR Code) स्कॅन करू नका. फसवणूक करणारे तुम्हाला सांगतात की हा कोड स्कॅन केल्यास तुमचा रिचार्ज होईल, पण प्रत्यक्षात तुमच्या खात्यातून पैसे त्यांच्या खात्यात ट्रान्सफर होतात.