Mumbai Rain Updates: मुंबईतसध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Mumbai Rain Updates) जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) शहरासाठी रेड अलर्ट (Red Alert) जारी केला आहे. याच पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरपालिकेने (BMC) आज (19 ऑगस्ट 2025) शहरातील सर्व सरकारी, निमसरकारी कार्यालये बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
पावसामुळे आधीच मुंबईतील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता शहरातील सर्व सरकारी, निमसरकारी कार्यालये बंद ठेवण्यात येणार आहे. तर खासगी कार्यालयांनाही कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी देण्यास सांगितले आहे.
बीएमसीने ‘X’ (ट्विट) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिलेल्या माहितीनुसार, “आज, 19 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईतील सर्व सरकारी आणि निमसरकारी कार्यालये बंद राहतील. खासगी कार्यालयांनाही त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू ठेवण्याची विनंती करण्यात येत आहे.”
📢मुंबईतील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये यांना आज दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी सुटी
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) August 19, 2025
🔹खासगी कार्यालये/ आस्थापनांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरी राहून कामकाज (वर्क फ्रॉम होम) करण्याच्या सूचना द्याव्यात
🌧️भारतीय हवामान खात्याने आज मंगळवार, दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी बृहन्मुंबई…
हा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या अंदाजामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे बीएमसीने स्पष्ट केले आहे. अत्यावश्यक सेवा मात्र नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत.
दरम्यान, सकाळपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. अटल सेतू, कोपर, चेंबूर आणि इतर काही परिसरांतील रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच, मुंबई शहर आणि उपनगरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांनाही आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
हे देखील वाचा –
राज्यात पावसाचा धुमाकूळ! 6 जणांचा मृत्यू! मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी 48 तास रेड अलर्ट
अंतराळातून परतल्यानंतर शुभांशु शुक्ला यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, दिली ‘ही’ खास भेटवस्तू
इतिहास परतला! सरदार रघुजी भोसले यांची 18 व्या शतकातील तलवार लंडनहून महाराष्ट्रात दाखल