Home / News / एमडी तस्करीप्रकरणी डीआरआयचे महाराष्ट्रासह अनेक राज्यांत छापे !७ संशयितांना अटक

एमडी तस्करीप्रकरणी डीआरआयचे महाराष्ट्रासह अनेक राज्यांत छापे !७ संशयितांना अटक

DRI Raids Across Multiple States Including Maharashtra in MD Drug Trafficking Case! 7 Suspects Arrested

DRI Raids Across Multiple States Including Maharashtra in MD Drug Trafficking Case! 7 Suspects Arrested

मुंबई – केंद्रीय महसूल गुप्तवार्ता विभागाने (DRI) शनिवारी मध्यप्रदेशमधील मेफेड्रॉन (MD drug trafficking) या अंमली पदार्थाची निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर धाड टाकल्यानंतर या तस्करीशी संबंधित संशयितांवर धाडसत्र सुरू केले आहे. मध्यप्रदेशसह महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये डीआरआयने छापे टाकले असून आतापर्यंत(7 arrested) सात संशयितांना अटक केली आहे.(drug smuggling)

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम (Daud ibrahim)याच्या टोळीशी संबंधित असलेला सलीम डोला अंमली पदार्थांचे रॅकेट चालवत असून या रॅकेटचा आंतरराष्ट्रीय तस्करांशी संबंध आहेत, असा डीआरआयचा दावा आहे.

डीआरआयने अटक केलेल्या संशयितांचा एमडीची निर्मिती आणि तस्करीमध्ये थेट सहभाग आहे, असा डीआरआयचा आरोप आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी प्रशांत थोरला नाशिकमधून तर विरेश शहा याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. हे दोघे एमडी तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा करत होते. अशरफ राईन याला उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यातून अटक करण्यात आली. तोदेखील भोपाळच्या कंपनीला कच्चा माल पुरवत होता. अझरुद्दीन इद्रिसी हा कच्चा माल भिवंडीहून भोपाळपर्यंत वाहून नेण्याचे काम करत होता. तर अब्दुल फैसल कुरेशी आणि रजाक खान हे भोपाळमध्ये प्रत्यक्ष एमडीच्या निर्मितीमध्ये गुंतले होते. सुरतमधून अटक करण्यात आलेली अंजली राजपूत ही महिला एमडीच्या विक्रीचे हवालामार्फत होणारे व्यवहार हाताळत होती, असा डीआरआयचा दावा आहे.