Home / News / शिंदे-शिरसाटांच्या खिशात ५० हजार कोटींचा मलिदाराऊतांचे शाहांना पत्र

शिंदे-शिरसाटांच्या खिशात ५० हजार कोटींचा मलिदाराऊतांचे शाहांना पत्र

Rs 50,000 Crore Bonanza in Shinde-Shirsat's Pockets Raut's Letter to Shah

Rs 50,000 Crore Bonanza in Shinde-Shirsat’s Pockets Raut’s Letter to Shah

मुंबई – पनवेलमधील सिडकोच्या ५० हजार कोटींच्या भूखंड घोटाळ्याचा मलिदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या खिशात गेला.(Shinde Shirsat fund controversy) त्यातील २० हजार कोटींचा वाटा स्वतः घेतला तर १० हजार कोटी थेट दिल्लीतील ‘बॉस’कडे गेले, असा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.(Raut Shinde Shirsat) या प्रकरणी राऊतांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)यांना पत्र (Sanjay Raut letter to Amit Shah)लिहून या सगळ्यांना दिल्लीतून पाठबळ मिळत असल्याचा दावा करत शिंदेंचे खरे बॉस दिल्लीमध्येच आहेत, असा टोलाही लगावला.

वन खात्याच्या मालकीची तब्बल ५ हजार एकर जमीन एका व्यक्तीला बिनबोभाट दिल्याप्रकरणी राऊतांनी शिंदे आणि सिडकोचे तत्कालीन अध्यक्ष शिरसाट यांच्यावर थेट भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. राऊत पत्रात लिहितात, वनखात्याच्या मालकीची ५ हजार एकर जमीन एका व्यक्तीला देण्यासाठीच सिडकोचे अध्यक्षपद शिरसाटांना देण्यात आले. शिंदे आणि शिरसाटांनी ते व्यक्ती पात्र नसतानाही त्याला जमीन दिली.

राऊत पत्रकारांना म्हणाले, शाहांकडे बोट दाखवले जात आहे. त्यांनी या घोटाळ्याची नुसती चौकशी नाही तर शिंदे आणि शिरसाट यांना बडतर्फ करायला हवे, असे पत्र मी गृहमंत्री शाह यांना लिहिले आहे. हजारो प्रकल्पग्रस्त लोकांना जमीन मिळत नाही आणि ५ हजार एकर जमीन एका व्यक्तीला दिली जाते, ती शिंदे-शिरसाट यांच्या आदेशाने दिली गेली . त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत. शाहांवर आरोप करत असलो तरी ते गृहमंत्री आहेत म्हणून मी त्यांना पत्र लिहिले आहे.
जमीन देण्याचे हे आदेश काढण्याच्या हेतूनेच शिंदे सरकारमध्ये अवघ्या २५ दिवसांसाठी शिरसाटांना सिडकोचा अध्यक्ष करण्यात आले. तत्कालीन नगरविकास मंत्री आणि सिडको अध्यक्ष यांना २० हजार कोटी रुपयांचा मलिदा मिळाला आहे. यातील १० हजार कोटी दिल्लीमध्ये त्यांच्या बॉसला देण्यात आले, असा सनसनाटी आरोपही राऊतांनी केला.

नेमके प्रकरण काय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी हे प्रकरण उघड केले . त्यांच्या मते, ही गोष्ट्र ब्रिटिश काळापासूनची आहे. त्या कुटुंबाने मराठा साम्राज्याच्या विरोधात ब्रिटिशांना मदत केल्याने ४ हजार एकरपेक्षा जास्त जमीन राजकीय इनाम म्हणून त्यांना मिळाली. रोहा, पनवेल आणि अलिबाग, उरण या जिल्ह्यातील १५ गावांत ही जमीन आहे. १९५२ मध्ये ही जमीन अधिकाऱ्यांना हाताशी धरून व्यक्तीगत इनाम अशी दाखवली. पण त्या जमिनीची मालकी त्यांच्याकडे नव्हती .१६ सप्टेंबर २०२४ रोजी सिडकोचे चेअरमनपदद मिळाल्यानंतर शिरसाटांनी पहिल्याच बैठकीत सिडकोच्या ताब्यातील ही जमीन या कुटुंबाला देण्याचा निर्णय घेतला.