Efforts to Provide Houses to Shivdi-Worli Corridor Project-Affected Families Through BMC Projects
मुंबई – शिवडी-वरळी कनेक्टर कॉरिडॉर(Shivdi Worli corridor project)या महत्वाकांक्षी प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्याचा मुद्दा बराच काळ रखडला आहे. या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या प्रभादेवी येथील रहिवाशांचे पुनर्वसन दक्षिण मुंबईतच करावे लागणार आहे. त्यामुळे हे पुनर्वसन रखडले आहे. त्यावर तोडगा म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या गृहनिर्माण प्रकल्पातील घरे प्रभादेवीच्या प्रकल्पग्रस्तांना देण्याचा विचार एमएमआरडीए करत आहे.(BMC housing project)
शिवडी-वरळी इलेव्हेटेड कनेक्टर(Mumbai coastal road) हा साडेचार किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग आहे. या मार्गामुळे अटल सेतूवरून थेट वांद्र-वरळी सागरी सेतू आणि किनारा रस्त्यापर्यंत (कोस्टल रोड) जाता येणार आहे. (Shivdi Worli sea link)मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड (एमटीएचएल) (Mumbai redevelopment projects)प्रकल्पासाठी हा उन्नत मार्ग महत्वाचा दुवा ठरणार आहे. या उन्नत मार्गामुळे विस्थापित होणाऱ्या प्रभादेवी येथील प्रकल्पग्रस्तांना घराच्या बदल्यात प्रत्येकी १ कोटी २० लाख रुपयांचे पॅकेज एमएमआरडीएने देऊ केले होते. मात्र हे पॅकेज प्रकल्पग्रस्तांनी धुडकावून लावले. (BMC relocation plan)शिवडीत तेवढ्याच आकाराच्या फ्लॅटची किंमत त्याहून जास्त आहे,असे प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे आहे. त्यामुळे हे पुनर्वसन बराच काळ रखडले आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी पालिकेच्या गृहनिर्माण प्रकल्पातील घरे प्रभादेवी येथील प्रकल्पग्रस्तांना द्यावीत,असा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे. पालिकेला आणि प्रकल्पग्रस्तांना जर हा पर्याय मान्य झाला तर पुनर्वसनाचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघू शकेल.